Maharashtra Politics  Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde Shivsena : नगरमध्ये चक्क पक्ष प्रवेश घोटाळा? शिंदे गटाच्या नेत्यावर बोगस यादीचा आरोप, राजकारण तापलं

Ahilyanagar Political News : अहिल्यानगरमध्ये शिंदे गटाच्या नेत्यावर पक्ष प्रवेश यादीत बोगस नावे समाविष्ट केल्याचा आरोप झाला आहे. मारुती मेंगाळ यांनी शक्तीप्रदर्शनाच्या वेळी सादर केलेल्या यादीतील ५० पेक्षा अधिक नावे बनावट असल्याचे समोर आले आहे.

Alisha Khedekar

  • मारुती मेंगाळ यांनी ठाणे येथे समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला होता.

  • त्यांनी सादर केलेल्या यादीतील अनेक नावे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

  • यादीतील लोकांनी स्वतःचा व्हिडीओ प्रसिद्ध करून प्रवेश नाकारला.

  • पक्षातर्फे अधिकृत चौकशी सुरू असून, मेंगाळ अडचणीत आले आहेत.

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात सध्या 'पक्ष प्रवेश घोटाळा' प्रकरणाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आर्थिक, जमीन किंवा नोकरभरती घोटाळ्यांप्रमाणे आता थेट पक्ष प्रवेशातच घोटाळा झाल्याचा आरोप होत असून, यात शिंदे गटाचे आदिवासी नेते मारुती मेंगाळ यांचं नाव समोर आलं आहे.

मारुती मेंगाळ हे अकोले तालुक्यातील ठाकर समाजाचे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांनी ठाणे येथे मोठ्या समर्थक गटासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी अकोले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आणि इतर पक्षीय पदाधिकारी आपल्या सोबत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे पक्षामध्ये उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र, आता त्याच शक्तीप्रदर्शनाच्या यादीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पक्ष प्रवेश यादीतील अनेक नावे बनावट असल्याचा आरोप आता प्रत्यक्ष त्या यादीतील व्यक्तींनीच केला आहे. या यादीतील काहींनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत आपण पक्षात प्रवेश केलाच नसल्याचं स्पष्ट केलं असून, त्यांच्या नावांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणानंतर शिर्डी लोकसभा क्षेत्राचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, मेंगाळ यांच्या पक्ष प्रवेशाची कोणतीही अधिकृत माहिती पक्षाकडे आधीपासून नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वी यादी समोर आल्यानंतर शहानिशा केली असता सुमारे ४० ते ५० नावे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. दराडे यांनी हा प्रकार पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करणारा असल्याचे सांगत यावर कठोर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त मारुती मेंगाळ अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश घोटाळ्याचा आरोप समोर आल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मारुती मेंगाळ यांच्यावर झालेल्या या आरोपांवर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्वतः एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल, याकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले असून, ‘सामाजिक आधारावर नव्हे, तर पारदर्शकतेच्या निकषांवरच पक्ष प्रवेश व्हावा’ अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

'पक्ष प्रवेश घोटाळा' प्रकरणात कोणाचा सहभाग आहे?

अकोले तालुक्यातील नेते मारुती मेंगाळ यांच्यावर बोगस यादी सादर केल्याचा आरोप झाला आहे.

काय आरोप करण्यात आले आहेत?

मेंगाळ यांनी शिवसेनेत प्रवेश करताना सादर केलेल्या यादीतील ४०-५० नावे बनावट असून, संबंधित लोकांनी प्रवेशच केल्याचा इन्कार केला आहे.

पक्षाकडून कोणती भूमिका घेतली गेली आहे?

शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठ नेत्यांना दिली असून, कठोर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

या घोटाळ्याचा आगामी कार्यक्रमावर काही परिणाम होईल का?

९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं असून, शिंदे गटाची भूमिका स्पष्ट होणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT