ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभललेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे आधीचे नाव अहमदनगर होते. अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ या जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले.
पावसाळ्यात फिरण्यासाठी अहिल्यानगरमध्ये अनेक सुंदर ठिकाणं आहेत. हिरवेगार डोंगर, शांत वातावरण, कोसळणारे धबधबे आणि निसर्गाची विहंगम दृश्ये मनाला भुरळ घालतात.
नैसर्गिक सुंदरताने नटलेले भंडारदरा हिल स्टेशन शांत वातावरण आणि मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. धुक्यांना झाकलेले डोंगर, कोसळणारे धबधबे आणि वळणावळणाच्या घाटतील प्रवासाचा अनुभव घ्यायला विसरु नका.
भंडारदरा डॅमला विल्सन डॅम म्हणूनही ओळखले जाते. १९१० मध्ये ब्रिटीशांनी हे धरण बांधले होते. निसर्गप्रेमींसाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे.
घनदाट जंगले आणि उंट टेकड्यांनी वेढलेले हे तलाव बोटिंग आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
पावसाळ्यात या ठिकाणाला भेट द्यायला विसरु नका. ओसंडून वाहणाऱ्या या धबधब्याचे मनमोहक दृश्य मनाला भुरळ घालतील.
अमृतेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. हे मंदिर भंडारदरापासून काही अंतरावरच आहे.
भंडारदरा डॅमपासून १० किलोमीटर अंतरावर रंधा धबधबा आहे. १७० फूट उंचीवरुन कोसळणाऱ्या या सुंदर धबधब्याला नक्की भेट द्या.