ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मीडिया वृत्तानुसार, उद्योगपती संजय कपूर यांचे तोंडात मधमाशी गेल्याने हार्ट अटॅकने निधन झाले.
मधमाशी चावल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो का, जाणून घ्या.
एक किंवा दोन मधमाशी चावल्याने मृत्यू होत नाही. परंतु मधमाशांचा हल्ल्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
मधमाशी चावल्याने अॅलर्जिक रिएक्शन होऊ शकते. ज्याला अॅनफिलेक्सिस असे म्हणतात. हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. परंतु डायबिटीज आणि हाय बीपीच्या रुग्णांना धोका जास्त असतो.
मधमाशीच्या डंकामध्ये जे विष असते ज्याला अॅपिटॉक्सिन असे म्हणतात. यामुळे त्वचेवर जळजळ, वेदना आणि सूज येते.
मधमाशी चावल्याने शरीरात ल्यूकोट्रीन, साइटोकाइन्स आणि थर्माक्सिनेट नावाचे केमिक्लस रिलीज होतात.
या केमिक्ल्समुळे नसांमधील रक्त गोठले जाते, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.