Maharashtra Deputy CM Sunetra Pawar  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावं चर्चेत, सुनेत्रा पवार कुणाच्या हाती देणार सूत्रं?

Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता या पदावर कुणाची वर्णी लागते याची चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी ५ नावं चर्चेत आहेत.

Priya More

Summary -

  • राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावं चर्चेत

  • रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर स्पर्धा वाढली

  • सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठं आव्हान

  • लवकरच नव्या अध्यक्षाची घोषणा अपेक्षित

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना चांगलेच भोवलं. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याआधी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात स्पर्धा सुरू झाली आहे. ५ महिला नेत्या या पदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापुढे हे पद कुणाकडे द्यायचे हे आव्हान आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सना मलिक, सरोज अहिरे, वैशाली नागवाडे, राजलक्ष्मी भोसले आणि प्रतिभा शिंदे यांची नावं आघाडीवर आहेत. या ५ महिला नेत्यापैकी एकाची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल. यापैकी कुणाला संधी द्यायची हे मोठं आव्हान सुनेत्रा पवार यांच्यापुढे आहे. अशोक खरात प्रकरण समोर आल्यापासून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.

विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. त्यांनी त्यांच्या राजीनाम्यासह अटकेची मागणी केली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला. तेव्हापासूनच या पदासाठी चांगल्या महिला नेतृत्वाचा शोध सुरू झाला. हे महत्वाचे पद असल्यामुळे अनेक महिला नेत्यांनी हे पद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी जी ५ नावं चर्चेत आहेत त्यामधील सना मलिक या आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचया कन्या आहेत. त्या अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करत आहेत. दुसरे नाव देवळालीच्या आमदार सरोज अहिरे याचे आहे. त्या एक अनुभवी आणि अभ्यासू नेत्या आहेत.

तिसरे नाव पुणे शहराच्या माजी महापौर आणि विद्यमान राज्य उपाध्यक्ष राजलक्ष्मी भोसले याचे आहे. चौथे नाव जळगावच्या प्रतिभा शिंदे यांचे आहे. काँग्रेसमधून नुकताच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या आहेत. पाचवे नाव वैशाली नागवाडे यांचे आहे. त्या राष्ट्रवादीच्या खंबीर नेत्या असून पुणे जिल्ह्यात सक्रीय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

पुण्यात काळाचा घाला! मोशी कचरा डेपोत ३ जणांचा बळी; २४ तासानंतरही ८ जण ढिगाऱ्याखालीच, ९ जणांना वाचवले

FIFA World Cup : विजय मिळाल्यानंतर एक चूक पडली महागात; इंग्लंडच्या खेळाडूचा हात फ्रॅक्चर, क्वार्टर फायनलला मुकणार, VIDEO

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

SCROLL FOR NEXT