Rupali Chakankar resignation : रूपाली चाकणकरांचा आणखी एक राजीनामा, सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाल्यानंतर निर्णय

Rupali Chakankar latest news : रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याआधीच त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. खरात प्रकरणामुळे त्यांच्यावर दबाव वाढल्याची चर्चा आहे.
Rupali Chakankar
Rupali Chakankar
Published On

Rupali Chakankar resigns from NCP women state president post : रूपाली चाकणकर यांंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे... भोंदू खरात प्रकरणात याआधीच त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.. या प्रकरणी चाकणकर यांनी ट्वीटही केले आहे.

काही दिवसांपूर्वी 'भोंदू खरात' प्रकरणावरून चाकणकर यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता पक्ष संघटनेतील पदाचाही राजीनामा दिल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच, असे चाकणकर यांनी एक्सवर म्हटले आहे.

Rupali Chakankar
Rupali Chakankar: अशोक खरातला गुरू का अन् कसं मानलं? रुपाली चाकणकरांनी सर्वकाही सांगितलं
Rupali Chakankar
तटकरे-चाकणकर बिझनेस पार्टनर, खरात प्रकरणात ठाकरेंच्या शिलेदारांचा खळबळजनक दावा, वाचा नेमकं काय म्हणाल्या?

खरात प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com