रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातबाबत स्पष्टीकरण दिलं
आध्यात्मिक श्रद्धेतून गुरू मानल्याचे सांगितले
खरातच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती नसल्याचा दावा
अशोक खरातवर कठोर कारवाईची केली मागणी
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरात प्रकरणाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा घात झाला. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना विरोधकांनी चांगलच धारेवर धरलं. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर आपल्याला धक्का बसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अशोक खरात यांना गुरू कसं मानलं याबाबत सर्वकाही सांगितले.
रुपाली चाकणकर यांच्यावर अशोक खरात प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप केले जात आहे. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अशोक खराला गुरू कसं मानलं आणि त्या त्याच्या संपर्कात कशा आल्या याबद्दल सांगितले की, 'समाजात आयुष्य जगत असताना आपण कुणाला ना कुणाला गुरू मानत असतो. खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने आणि मी गुरू मानले. एक आध्यात्मिक श्रद्धा आणि भावना असते. माझे संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे. त्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती अध्यात्मिक दृष्टीकोनातून होती. म्हणून आमचे कुटुंब या देवस्थानाशी जोडले होते.'
अशोक खरात यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हती असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, 'पण अशोक खरातची दुसरी बाजू ती आमच्यासमोर कधीच आली नाही. त्यामुळे आम्हाला माहिती असायचे काही कारण नाही. वर्षातील काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालवाधीसाठी आम्ही तिथे असायचो. ज्यावेळी आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते ५-६ वर्षानंतर ते कृत्य, एखाद्याची वैयक्तीक वागणूक, त्याचे वैयक्तीक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतिही सुतराम कल्पना नसते. त्यामुळे ही घटना कळाली तेव्हा मला मोठा धक्का बसला. पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती असायचे काही कारण नव्हते.'
तसंच, 'या प्रकरणामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष तपास व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या सुनेत्रा वहिनींकडे सोपवला आहे. याबाबतचा पुढचा जो काही निर्णय असेल तो सुनेत्रा पवार घेतील.', असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.