तटकरे-चाकणकर बिझनेस पार्टनर, खरात प्रकरणात ठाकरेंच्या शिलेदारांचा खळबळजनक दावा, वाचा नेमकं काय म्हणाल्या?

Rupali Chakankar controversy : खरात प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्यावर 450 कोटींच्या भागीदारीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी जोर धरत आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam TV
Published On

खरात फाईल्स समोर आल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या आहेत... त्यातच रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरेंनी अघोरी कृत्यासाठी अनामिका कापल्याचा आरोप अंधारेंनी केला होता.. या आरोपानंतर आता अंधारेंनी तटकरे आणि चाकणकर बिझनेस पार्टनर असल्याचा आरोप केलाय... यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

महिलांना वासनेची शिकार बनवणाऱ्या भोंदू खरातचे पाय धुतल्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकरांच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीत... चाकणकरांनी महिला आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर सुषमा अंधारेंनी आपला मोर्चा चाकणकरांसोबत तटकरेंकडे वळवलाय.. सुषमा अंधारेंनी गणिताच्या सुत्राचा दाखला देत सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर हे बिझनेस पार्टनर असून त्यांची 450 कोटींची भागिदारी असल्याचा आरोप केलाय...

Maharashtra Politics
अशोक खरातची दुसरी बाजू....; राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया

हा गौप्यस्फोट करताना अंधारेंनी दीपक केसरकर यांनाही घेरलंय.. दीपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री असताना सिन्नरच्या एमआयडीसीचा आणि त्यांचा काय संबंध? असा सवाल उपस्थित करतानाच अंधारेंनी केसरकर, चाकणकर आणि खरातच्या फोटोंचा अल्बमच दाखवलाय.. एवढंच नाही तर खरात, केसरकर आणि चाकणकरांच्या कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी केलीय..

Maharashtra Politics
Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, रेल्वे सेवा 15 मिनिट उशिराने

खरं तर खरातच्या काळ्या जादूचे अनेक किस्से चर्चिले जात आहेत... चाकणकर आणि तटकरेंनी अनामिका कापून अघोरी कृत्य केल्याचा आरोप अंधारेंनी केला होता... आता पुन्हा एकदा अंधारेंनी चाकणकर आणि तटकरे यांच्यात व्यावसायिक भागिदारी असल्याचा आरोप केल्यानं चाकणकरांसोबत तटकरे आणि दीपक केसरकरांचंही टेन्शन वाढलंय... त्यामुळे अंधारेंच्या मागणीप्रमाणे एसआयटी चाकणकरांना अटक करुन खरात प्रकरणाचा आणखी सखोल तपास करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही न्यूज...नाशिक

Maharashtra Politics
कॅप्टन खरातमुळे राजकीय नेता अडचणीत? कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com