

मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ठाण्यातून कल्याण चा दिशेने जाणारी रेल्वेची सेवा 15 मिनिट उशिराने सुरू आहे. सदरचे यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरू आहे.
सध्या राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत वेगवेगळया भूमिका मांडल्या जात आहेत. त्याबाबतच निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं आदिती तटकरे म्हणाल्या.
बुलेट ट्रेन च्या विषयावरून श्रेयवाद घेताना भाजपा नगरसेवकांनी देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो म्हणताच बविआ नगरसेवकांनी थेट हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर जैसा हो अशा घोषणा दिल्या.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या हायव्होल्टेज ड्राम्यात आता नाट्यमय वळण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या ठिकाणी पोहोचत असताना त्यांना दारातून स्थानिक गुन्हे शाखेने अपहरणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर त्यांना महाबळेश्वर मध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिग्रस शहरात गारांसह अवकाळी पाऊस,दिग्रस शहरात दहा मिनिट अवकाळी पावसाने लावली हजेरी. दिग्रस शहरात अचानक वादळ वाऱ्यासह जोरदार गारांचा अवकाळी पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट चा इशारा दिला होता,तद्नंतर दिग्रस शहरात गारांसह अवकाळी पावसाने झोडपलं.
डहाणू समुद्रकिनाऱ्यावर आज डहाणू नगरपरिषदेकडून डहाणू महोत्सवाच आयोजन करण्यात आल आहे . राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला असून असे महोत्सव हे ग्रामीण भागासह शहरी भागात देखील महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी प्रताप सरनाईक यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.
पुणे सातारा महामार्गावरील एका टेकडीवर चढून एक तरूणी जीव देण्याचा प्रयत्न करत आहे. कात्रज घाटातील हायवेला लागून असलेल्या टेकडीवर ती चढली आहे. तिला खाली उतरण्याची विनंती नागरिक करत आहेत. परंतु ती ऐकण्याच्या स्थितीत नसून टेकडीच्या एकदम काठावर उभी आहे.
रुपाली चाकणकरांचा उद्या फैसला होणार आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची उद्या महत्वाची बैठक होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
- जमिनींसह सिन्नर शिर्डी रस्त्यावर हार्डवेअरचे मोठं शो रूम
- शिवसंकल्प हार्डवेअर दुकान पत्नीच्या नावावर
- शो रूम मेव्हणा सांभाळतोय, तर कोट्यावधींची बेनामी जमिनींसह बांधकाम व्यवसायात देखील खरातची भागीदारी असल्याची माहिती
- नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक ठिकाणी प्लॉटस खरेदी
- सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता
- अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचे समोर
- या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का ? याकडे लक्ष
लोणावळा नगरपरिषदेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील वाद चिघळला असून, नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक साबळे यांच्या कॅबिनला टाळे ठोकत निषेध नोंदवला. निवडणुकीनंतर तीन ते चार महिने उलटूनही मुख्य अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच इतर लोकप्रतिनिधी यांनीही या कारवाईला पाठिंबा दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या मते, मुख्य अधिकाऱ्यांनी सर्व अधिकार स्वतःकडेच ठेवले असून इतर विभागांना कोणतेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलेले नाही. त्यामुळे प्रत्येक कामासाठी “साहेबांना विचारावे लागेल” असे सांगितले जाते आणि नागरिकांची कामे प्रलंबित राहतात.
भिवंडी शहरातील बाला कंपाउंड परिसरात नळासाठी खोदलेल्या खड्ड्यांवरून दोन गटांमध्ये तुडुंब हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक हसनैन फारुकी यांच्या ठेकेदारामार्फत नळ बसवण्यासाठी खड्डे खोदण्यात आले होते व रस्त्याचे काम सुरू असताना नळासाठी खोदण्यात खड्ड्यांवरून वाद निर्माण होऊन दोन गट आमनेसामने आले. ठेकेदार व स्थानिक यांच्यात वाद निर्माण झाले त्यानंतर नगरसेवकांचे समर्थक तिथे आले आणि दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली.
- रामकल पथ प्रकल्पाला अडथळा ठरणारे दुकाने हटविण्यास सुरुवात
- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकाल पथ प्रकल्प महत्वकांक्षी प्रकल्प
- प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून प्रकल्पासाठी अडथळा ठरणाऱ्या दुकानावर रामकुंड परिसरात हातोडा
- कारवाई करत असताना नागरिकांकडून गोंधळ
- पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे काम सुरू
- कॅप्टन खरात प्रकरणात सरकारने नेमलीये SIT
- SIT च्या प्रमुख म्हणून IPS तेजस्विनी सातपुते यांची नेमणूक
- सातपुते यांच्या उपस्थितीत नाशकात सुरू आहे बैठक
- सातपुते यांनी खरातची काल दोन तास केली होती चौकशी
- सलग ५ तासांपासून SIT च्या बैठकीत कॅप्टनच्या कारनाम्यावर सुरू आहे चर्चा
- वावी, शिर्डी, आणि सरकारवाडा पोलिसांत दाखल गुन्ह्यांचा SIT कडून तपास सुरू
यवतमाळ शहरातील गुरुकृपा नगरी परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे महाराजांचा प्रगट दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने गेल्या आठ दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मंदिरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. विविध मार्गाने मार्गक्रमण करून ही पालखी पुन्हा मंदिरात आली. त्या ठिकाणी काल्याचे किर्तन होऊन महाप्रसाद वितरित करण्यात आला. प्रगटदिनी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पिंपरी चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातील फार्मसीतून तब्बल ५ लाख २२ हजार रुपयांहून अधिक किमतीची इंजेक्शने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत ही घटना घडली. रुग्णालयातील फार्मसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या ताब्यातील इंजेक्शने लबाडीच्या हेतूने चोरी केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी संदिप सुबराव लाखे (वय ४५, रा. गजराज कॉलनी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून, प्रथमेश रमेश शिंदे (वय २५, रा. चिखली) याच्याविरुद्ध बीएनएस कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फर्ग्युसन रस्त्यावर रानडे इन्स्टिट्यूट शेजारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सांडपाणी वाहिनीच्या चेंबर मधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी आल्याने वाहनचालकांना कसरत करून वाहने चालवावी लागल होती. जलवाहिनी फुटली की सांडपाणी रस्त्यावर येत आहे हे नागरिकांना समजू शकते नाही.
लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरात याने साईबाबांच्या शिर्डीत कोट्यावधीच्या मालमत्ता घेतल्याचं समोर येतंय.. 50 कोटीपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेला भूखंड समोर आलेली असताना, आता आणखी एक 5 कोटीपेक्षा जास्त किमतीचा भूखंड बायकोच्या नावे घेतल्याचं समोर आलं आहे.. एव्हढंच नाही तर शिर्डीतील अनेक उद्योग, हाॅटेल लाॅन्सला देखील हा भोंदूबाबा निनावी पार्टनर असल्याची चर्चा आहे.
हडपसर मोहम्मद वाडी मधील एका सोसायटीच्या बाहेरी घटना
दारूच्या नशेत दोघांनी केली वॉचमनला मारहाण
दारू पिलेले होते त्यामुळे सोसायटी आवारात जाऊ नका म्हणून थांबवले असता केली मारहाण..
रात्री साडे सात वाजता घडला प्रकार
डोक्यात मारहाण केल्याने वॉचमन जखमी
सोसायटी गेट बाहेरील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
काळेपडळ पोलिस स्टेशन अधिक तपास करत आहे.
खेड तालुक्यातील जैदवाडी गावच्या हद्दीत एका ३३ वर्षीय तरुणाचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील धनंजय मारुती घेवडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आजपासून दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होणार
आज उद्या मराठवाडा,विदर्भाला येलो अलर्ट
परभणी,हिंगोली,जालना,नांदेड,जळगाव जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
२४ मार्चपर्यंत ही परिस्थिती राहणार
शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज
25 तारखेनंतर उन्हाचा तडाका वाढण्याची शक्यता..
रुपाली ठोंबरे करणार उच्च न्यायालयात याचिका दाखल
अशोक खरात, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात दाखल करणार याचिका
या प्रकरणाची सी बी आय चौकशी करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका
रुपाली चाकणकर यांचा अशोक खरात यांच्याशी असलेला संपर्क फक्त ट्रस्ट पर्यंतचा होता तर हातावर मेहंदी असलेला फोटो कुठून आला? यासोबतच चाकणकर यांचा एक फोटो आहे जिथे त्यांची करंगळी कापली आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये बँडेज दिसत आहे त्याचा आम्ही शोध घेतला तेव्हा तो २ सप्टेंबर २०२४ असलेल्या सोमवती अमावस्या दिवशीचा आहे याचा अर्थ त्या स्वतः काळी जादूटोणा करतात असा आरोप शिवसेना उबाठा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. अनामिका जीव नाडी आहे असं म्हणतात आणि मग सूर्य आणि शुक्राचा प्रभाव मिळण्यासाठी असे विधी करताना दिसतात त्यामुळे हा सगळा त्यातला प्रकार असल्याचं आणि हे फोटो दाखवत सुषमा अंधारे यांनी आरोप केलेत. चाकणकर या cha सी डी आर तपासला जायला पाहिजे तसंच त्यांना सहआरोपी करा, नार्को टेस्ट त्यांची करा अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.
गॅस पुरवठा होत नसल्यामुळे जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील इंडियन ऑटो गॅस पंप गेल्या आठवड्याभरापासून बंद
वाहनधारकांच्या बाब लक्षात यावी म्हणून पंपावर गॅस शिल्लक नसल्याबाबतचा फलक देखील लावण्यात आला आहे..
एलपीजी गॅस चा तुटवडा होत असल्याने तर दुसरीकडे कंपनीकडून गॅसचा पुरवठा न झाल्याने आठवडाभरापासून गॅस पंप बंद..
वेळेवर एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे गॅस पंप बंद असल्याने आर्थिक नुकसानाचा गॅस पंप चालकांना सामना करावा लागत आहे..
जळगाव शहरात चार ते पाच एवढेच गॅस पंप असून त्यावरही वेळेवर गॅस मिळत नसल्याने रिक्षा चालक तसेच एलपीजी गॅस वाहनधारकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
संगमनेर येथील धक्कादायक घटना...
आठ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न...
वडगावपान येथील ऍसिड फेक प्रकरणाला चार दिवस होत नाही तोच पुन्हा संतापजनक घटना...
अवघ्या 8 वर्षांच्या चिमुरडीवर 27 वर्षीय नराधमाचा अत्याचाराचा प्रयत्न...
एका महिलेच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला...
आरोपी युवराज सिताराम हासे याच्याविरोधात गुन्हा दाखल...
पोक्सो, विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल...
पोलीसांनी केवळ नोटीस देऊन आरोपीला सोडून दिल्याची माहीती...
हिंगोलीत ग्रामीण भागातील नागरिकांना गॅस टंचाईचा मोठा फटका बसला आहे, शेतातील कामे सोडून ग्रामीण भागातील नागरिक तासंतास गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या वाहणाची वाट पाहत बसत आहेत, हिंगोलीच्या चिंचोली गावातील हि दृश्य आहेत दरम्यान अवकाळी पावसामुळे लाकडी भिजली आहेत वादळी वाऱ्याने विजेचे खांब कोसळले असल्याने शेगड्या बंद झाल्या आहेत तर गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने उपाशी राहण्याची वेळ आल्याचे गावकरी सांगत आहेत
रुपयातील घसरण सुरूच असून आज सुरुवातीच्या व्यवहारात रुपया पहिल्यांदाच 93 प्रति डॉलरच्या पुढे घसरत 93.22 वर आला.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने काल जोरदार हजेरी लावली, तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले,
या अचानक झालेल्या पावसामुळे उन्हाळी हंगामातील गहू, कांदा तसेच इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी लावलेला हिरवा चारा देखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला आहे.
या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
रूपाली चाकणकर यांना तत्काळ अटक करा
रुपाली चाकणकर यांची नार्को टेस्ट करा
समोरासमोर बसवून चौकशी व्हावी, आधी त्यांना पदावर बाजूला करा
रूपाली चाकणकर फरार होण्याच्या आधी कारवाई झाली पाहिजे
त्या पॉलिटिकल प्रेशर वापरू शकतात
चाकणकर आणि खरात यांचे CDR तपासले जावेत
बारामती,दौंड,मुळशी परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची गंभीर दखल घेत,तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गहू बीट फळबागा याचं झालं नुकसान
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रशासनाला वेगाने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कडून देण्यात आल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव – जालना महामार्गावरील अमडापूर टोल प्लाझा येथे काल रात्री उशिरा परिवहन महामंडळाच्या शयनयान बसचा अपघात झाला. अमरावती येथून पुणे कडे निघालेली ही बस पावसामुळे घसरून टोल नाक्यावरील खांबाला धडकली. परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे चालकाला रस्त्याचा अचूक अंदाज न आल्याने तसेच रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बसचे ब्रेक वेळेत न लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात ४ ते ५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे महामार्गांवर घसरडी परिस्थिती निर्माण होत असून वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मध्यरात्री 2.40 वाजता पुण्यातील मांजरी बुद्रुक भागात असलेल्या घुले नगर मधील घटना
भीषण आगीच्या घटनेचा व्हिडिओ समोर, आगीमुळे रात्री परिसरात मोठे धुराचे लोण
किराणा मालाच्या दुकानामध्ये आग लागली असता अग्निशमन दलाकडून आगीवर वेळीच नियंत्रण
सुदैवाने आगीत कोणीही जखमी नाही
आगीचे नेमकं कारण स्पष्ट नाही
वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरण ने कडक भूमिका घेत वसुली मोहिमेला गती दिली आहे. थकबाकी वाढत असल्याने अशा ग्राहकांचे थेट वीज मीटर काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक मिळून लाखो ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी आता आक्रमक पावले उचलली जात आहेत. कारवाई अंतर्गत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढले जात असून, पूर्ण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही. याशिवाय संबंधित ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. ज्यामुळे पुढील थकबाकी टाळण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, काही ठिकाणी अनधिकृत वीज वापराचे प्रकारही समोर आले असून अशा प्रकरणांवर कडक कारवाईचा इशारा देत, वीज चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची तयारी महावितरणने दर्शवली आहे.
आखाती देशातील युद्धाचा परिणाम, तेल कंपन्यांनी ब्रॅण्डेड पेट्रोलचे दर वाढवले
पेट्रोल पंपातील पॉवरच्या पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशानी वाढ
एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन आँईल अशा तेल कंपन्यांच्या पाॅवर पेट्रोलच्या दरात केली वाढ
सध्यातरी साधे पेट्रोलच्या दरात वाढ नाही, त्यामुळे सर्वसमान्यांना दिलासा
रत्नागिरी मध्ये सध्या पाॅवर पेट्रोलच्या किंमती 113.11 तर याची कालची किंमत होती....115.20
या यापूर्वी युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेल पुरवणाऱ्या इंधन कंपन्याकडून केड्रिटवर इंधन खरेदी केली बंद
महाराष्ट्रात ८ हजार तर देशात १ लाखांच्या घरात पेट्रोल पंप
चवदार तळ्याचे पाणी पिण्या योग्य नाही, या वरून आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणाचे काम MIDC करणार असल्याची माहिती मंत्री शिरसाट यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सावरवाड येथे स्फटिक लिंगाची निर्मिती करण्यात आली आहे. हे स्फटिक लिंग पाहण्यासाठी पर्यटकांची पावले येथे वळताना दिसत आहेत. कोकणची भूमी ही देवभूमी मानली जाते आणि याच भूमीत निसर्गाचा आणि अध्यात्माचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतोय. सावरवाड येथे असलेल्या एका अशा स्फटिक शिवलिंगाची सध्या देशभर चर्चा आहे, जे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील सर्वात मोठ्या स्फटिक शिवलिंगांपैकी एक असल्याच बोललं जात आहे. हे स्फटिक शिवलिंग केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून ते एक ऊर्जेचे केंद्र बनले आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे 'वायव्यमुखी' आहे. अशा प्रकारचे वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग अत्यंत दुर्मिळ मानले जाते. हे स्फटिक लिंग पाहण्यासाठी पर्यटक व शिवभक्त गर्दी करू लागले आहेत.
बंदुकीच्या जोरावर क्रांती घडविण्याच्या स्वप्नात अडकलेल्या नक्षल चळवळीतील सहभागींनो आता वेळ आली आहे, तुम्ही हिंसेच्या मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा. सरकार विविध योजना राबवत असून, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. शस्त्र धरून नाश होईल परंतु विकासाच्या वाटेवर चालून जीवन उजळता येईल. शांततापूर्ण जीवन जगण्याची संधी सोडू नका.
नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. काल सायंकाळी अनेक ठिकाणी आवकाळी पाऊस आणि गरपीट झाली. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला बसला.अर्धापूर तालुक्यातील रोडगी , सोनाळा, चाभरा , खैरगाव , निमगाव या शिवारात गारांचा पाऊस झाला. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे या भागात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.गहू,आंबा, टरबुज,केळी, काढून ठेवलेली हळद यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तालुक्यातील सोनाळा आणि बावणबीर मंडळातील अनेक गावांमध्ये गहू, कांदा, केळी आणि मका या पिकांना मोठा फटका बसला आहे.
अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, काढणीस आलेली पिके पूर्णपणे भिजून खराब झाली आहेत. विशेषतः गहू आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे.
या अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बळीराजावर आणखी संकट कोसळले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली होती, मात्र या नुकसानीमुळे त्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
धाराशिव जिल्ह्याला सलग तीन दिवसापासून अवकाळी पावसाने झोडपले आहे.वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाल्याने धाराशिव मध्ये केळीच्या बागा उध्वस्त झाले आहेत. आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात बंद झाली आहे.त्यामध्येच अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने केळीची झाडे अक्षरशा मोडून पडली आहेत.धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे.त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे,
शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत जनगणनेचे कामे, त्यामुळे सुट्टीत कामे केल्याच्या बदल्यात विशेष सुट्टीची मागणी...
१६ मे ते १५ जूनदरम्यान शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश
डिजिटल जनगणनेसाठी शिक्षकांचे प्रशिक्षणही होणार
सुट्टीत मुख्यालय सोडता येणार नाही, शिक्षण अधिकाऱ्यांचे निर्देश
३० एप्रिलला शैक्षणिक सत्र समाप्त, २ मेपासून सुट्ट्या सुरू, २६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात
उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना कामावर हजर राहावे लागणार, निवडणुकांनंतर पुन्हा शासकीय कामात शिक्षक गुंतणार
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यवतमाळच्या पुसद येथे उभारलेल्या वसंत उधानाच्या कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने 19 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने हा निर्णय घेतला असून या निधीतून उद्यानाचे पुनर्निर्मान सर्वांगीण विकास आणि वसंतराव नाईक यांच्या स्मृती जपण्यासाठी वस्तू संग्रहालयाचे काम केले जाणार आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार
रुपाली ठोंबरे पाटील यांचा खळबळजनक दावा
फेसबुकच्या पोस्ट मध्ये रुपाली पाटील यांनी दावा केला असून रुपाली चाकणकर यांना पुन्हा लक्ष केल आहे
नाशिक मधील कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर ही मोठी टीका होत आहे
गेल्या दोन दिवसापासून रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर येत नसल्याने रूपाली ठोंबरे यांची पोस्ट
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेचा शुभारंभ काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उत्साहात झाला. राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्यांनी परिसर दणाणून गेला. निगवे दुमाला येथील हिम्मत बहाद्दूर चव्हाण सरकार यांची मानाची सासनकाठी मिरवणुकीने मंदिरात दाखल झाली. यावेळी “जोतिबाच्या नावानं चांगभलं” च्या जयघोषात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करण्यात आली. मुख्य मंदिरात राजेशाही थाटात महापूजा पार पडली, तसेच ज्योतिर्लिंग मंडपात पंचांग वाचन करण्यात आले. दरम्यान, सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, लातूर आदी भागांतून सासनकाठ्या सज्ज झाल्या असून मुख्य यात्रा १ एप्रिल रोजी पार पडणार आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुण बाणेर परिसरात एका दुचाकीवरून गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बाणेर भागातील महापालिकेच्या जलतरण तलावाजवळ सापळा रचून या दोघांना अडवले आणि त्यांना चौकशी करायला सुरुवात केली. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात एक पिशवी मिळून आली ज्यामध्ये हळदीची पाकिटे होती. या पाकिटांची तपासणी केल्यानंतर त्या पाकिटांमध्ये गांजा लपविल्याचे उघड झाले
आयएलएस लॉ कॉलेजमध्ये आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
16 ते 17 विद्यार्थ्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
16 मार्चला या विद्यार्थ्याने मूलभूत सुविधा मिळावे यासाठी लॉ कॉलेजमध्ये आंदोलन केलं होतं
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थ्याकडून प्राचार्याच्या जालना ठिया आंदोलन सुरू करण्यात आलं होतं
परवानगी नसताना सुद्धा आंदोलन करण्यात आलं तसंच बेकायदा जमाव जमवण्यात आला याशिवाय घोषणाबाजी केली असे आरोप ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्रशासकीय कामात अडथळा आणला कर्मचाऱ्यांना इमारतीत येण्या जाण्यास अडथळा झाला असं तक्रारीत नमूद करण्यात आला आहे
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये प्रमोद सावंत यांच्यावर शस्त्रक्रिया
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया
छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी केली. त्यानंतर ॲन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी यशस्वीरित्या पार पाडली
सध्या प्रमोद सावंत यांची प्रकृती स्थिर आहे
दिलीतोद्धार चळवळीतील महत्व पूर्ण घटना असणाऱ्या महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभुमीवर आयोजित कार्यक्रम आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगड दौऱ्यावर येत आहेत. याचवेळी त्यांच्या सोबत मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत, भरत गोगावले आदिती तटकरे देखील उपस्थित राहणार आहे. चवदार तळे सौदर्यीकरण आणि पाणी शुद्धीकरण या कामासाठी शासनामार्फत 55 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामांच भुमीपुजन या वेळी केल जाणार आहे.
जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास अनेक भागात गारांसह पाऊस पडला या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू पिकासह फळबागांचा अतोनात नुकसान झाल आहे.जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील शेतकरी अशोक सातभाये यांचं गहू पीक अक्षरशः भुई सपाट झाला आहे.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हरवल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आहे. जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारांसह पाऊस झाल्यामुळे गहू पिकांसह कांदा आणि फळबागांचा अतोनात नुकसान झाला आहे.
स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या किंमती मध्ये वाढ
साध्या पेट्रोल मध्ये कुठली ही भाववाढ नाही
प्रत्येक लिटर मागे २.०९ रुपयांनी वाढले भाव
१११.६८ रुपये स्पीड आणि पॉवर पेट्रोल चे जुने दर
११३.७७ स्पीड आणि पॉवर पेट्रोल चे नवीन दर
दोन्ही प्रकारच्या पेट्रोलची दरवाढ आजपासून लागू
गडचिरोली जिल्ह्याच्या उपविभाग भामरागड अंतर्गत अतिदुर्गम बंगाडी येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना
1000 सी–60 कमांडो, 18 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र
विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल व इतर वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन
सन-2023 पासूनच्या सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 11 व्या नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना
अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी...
राहाता, श्रीरामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...
अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात...
हाताशी आलेल्या पिकांना वाचविण्याचे संकट
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पाऊसाची हजेरी लावली. अचानक जोरदार वारा सुटल्याने पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या गव्हाचे ज्वारी चे नुकसान होण्याची शक्यता आहे .
हिंदू नववर्ष व गुडीपडव्या निमित्ताने नाशिकच्या येवला शहरात रात्री बालाजी गल्लीतील सुंदर राम मंडळा तर्फे श्रीराम,लक्ष्मण,सीता यांची शहरातून रथातून मिरवणूक काढण्यात आली,नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते रथ ओढण्यात येऊन रथ मिरवणुकीला सुरवात झाली,या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या,तर विठ्ठल-रुखमाई चे वेष परिधान केलेले बालक मिरवणुकीत सहभागी झाले होते,रात्री उशिरा पर्यंत ही रथ मिरवणूक शहरातील विविध भागातून फिरून पुन्हा बालाजी गल्लीतील मंदिरात पोहचली.
पालघर जिल्ह्यातील चारोटी परिसरात वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून 11 केव्ही वीज वाहिनीचा डीपी थेट घरावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वीज पोल आणि डीपी कोसळून घराचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.