Shevgaon Vidhansabha Saam Tv
महाराष्ट्र

Shevgaon Vidhansabha : यंदा शेवगावमध्ये भाजप हॅट्रिक करणार की महाविकास आघाडी विजयाचा डंका वाजवणार? काय आहे सध्याची राजकीय परिस्थिती ?

Shevgaon Vidhansabha Matadarsangh Profile : शेवगाव भाजपचा बालेकल्ला म्हणून ओळखला जातोय. मागील दोन पंचवार्षिकपासून सतत भाजपचा उमेदवार शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणून आलाय. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात यंदा भाजपला अहमदनगर मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नेमकं कोणाला रिंगणात उतरवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीमधील नगर जिल्ह्यातील जनतेचा कल विद्यमान नेत्यांबाबत काहीसा नाराजीचा असल्याचं दिसलं. अहमदनगर येथील शेवगाव मतदारसंघातील भाजपचा अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आलाय. पक्षातुनच विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना विरोध होत असल्याचं दिसतंय.

काही दिवसांपूर्वी शेवगावमध्ये झालेल्या निर्धार मेळाव्यात अरूण मुंडे आणि गोकुळ दौंड यांनी आमदार राजळे यांचं काम करणार नाही, असं सांगितलं होतं. भाजपमधील या अंतर्गत वादाचा फायदा महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये होवू (Maharashtra Politics) शकतो. त्यामुळे विधानसभेसाठी महायुती नेमकं कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार? त्यानंतर इतर कार्यकर्त्यांची भूमिका काय असणार, याकडे शेवगाव तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे.

सध्या काय चित्र ?

शेवगाव विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तेथील विद्यमान आमदार सध्या भाजप नेत्या मोनिका राजळे आहेत. त्यामुळे शेवगावमधून विधानसभेसाठी मोनिका राजळे या महायुतीकडून प्रथम दावेदार आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरूण मुंडे देखील विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक असल्याची माहिती (Shevgaon Vidhansabha Matadarsangh) मिळतेय. अरूण मुंडे यांनी शेवगाव विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय. अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे आता महायुती तिकीट नेमकं कोणाला देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे.

बंडखोरीच्या राजकारणानंतर चंद्रशेखर घुले यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय. प्रताप ढाकणे यांनी २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यंदा ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. आता भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये महाविकास आघाडी विजयाचा गुलाल उधळणार का? महाविकास आघाडी भाजपचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

२०१९ ची विधानसभा निवडणूक

शेवगावमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजयाचा गुलाल उधळला होता. २०१९ मध्ये शेवगाव विधानसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी लढत झाली (Assembly Election 2024) होती. भाजप उमेदवार मोनिका राजीव राजळे या १, १२, ५०९ मतांनी विजयी झाल्या होता. तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचा १४, २९४ मतांनी पराभव झाला होता. तर भाजपने आपली विजयाची फताका शेवगावमध्ये फडकवली होती.

२०१४ ची विधानसभा निवडणूक

शेवगावमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजयाचा डंका वाजवला होता. २०१४ मध्ये शेवगाव विधानसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी चुरशीची लढत झाली होती. भाजप उमेदवार मोनिका राजीव राजळे (Shevgaon News) या १, ३४, ६८५ मतांनी विजयी झाल्या होता. तर राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा ५३, १८५ मतांनी पराभव झाला होता. आता नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवगावमध्ये भावी आमदार कोण असणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

Nandurbar News: अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास, आदिवासींच्या यातना संपेना|VIDEO

SCROLL FOR NEXT