Kopargaon Assembly constituency: कोपरगाव मतदारसंघात कोण फडकवणार विजयाची पताका? काळे-कोल्हेंच्या लढाईकडे साऱ्यांचं लक्ष

Vidhan Sabha Election 2024 Kopargaon Assembly Constituency Political Profile: कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे यंदा कोपरगाव मतदारसंघामध्ये कोण रिंगणात उतरणार आणि कोण विजयाची पताका फडकवणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ
Kopargaon Assembly constituencySaam Tv
Published On

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला मिळणार? यासाठी मोठी रस्सीखेच दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ सहकाराचा बालेकिल्ला समजला जातो. अहमदनगर-मनमाड महामार्गावर वसलेल्या कोपरगाव शहराला खूप प्राचीन परंपरा आहे. या तालुक्यात काळे आणि कोल्हे दोन कुटूंबांनी आतापर्यंत आलटून पालटून सत्ता मिळविली आहे. कोपरगाव मतदार संघामध्ये काळे आणि कोल्हे या दोन घराण्यांतील संघर्ष संपूर्ण राज्यानं पाहिला (Kopargaon Assembly Constituency) आहे. कोपरगाव मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांच्यातील लढत परंपरागतच समजली जाते. आतापर्यंतचा इतिहास पाहता सत्ता कधी कोल्हेंकडे तर कधी काळेंकडे राहिली आहे. या दोघांव्यतिरिक्त अजून तिसरं कोणतं समीकरण या तालुक्यात उदयास आलेलं नाही.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ

तालुक्यात माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे (NCP Ashutosh Kale) या दोन नेत्यांच्या भोवतीच राजकारण सतत फिरत राहिलंय. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पक्ष होते. ते पक्ष स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते. शंकरराव कोल्हे ३५ वर्ष आमदार राहिले होते. त्यांना तीन वेळेस मंत्रीपद मिळालं होतं. त्यांनी पुत्र बिपीन कोल्हे यांना २००४ साली निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर अशोक काळे २००४ आणि २००९ या दोन्ही पंचवार्षिकमध्ये विजयी झाले होते.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

सलग दोन्ही वेळेस सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये पुत्र आशुतोष काळे यांना रिंगणात उतरवलं होतं, मात्र आशुतोष काळेंना पराजयाला सामोरं जावं लागलं. तर २०१४ च्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी सूनबाई स्नेहलता कोल्हे (BJP Snehalata Kolhe) यांना रिंगणात उतरवलं होतं. स्नेहलता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत विजयी झाल्या होत्या. दोन्हीही पक्ष आतापर्यंत स्वबळावरच लढले आहे. कोपरगाव मतदारसंघावर कधी भाजप तर कधी शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय.

२०१९ ची विधानसभा निवडणूक

विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा काळे आणि कोल्हेंमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. २०१९ ला भाजपकडे असलेला मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेला. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आशुतोष अशोकराव काळे यांनी स्नेहलता कोल्हेंना पराभूत करत कोपरगावमध्ये विजयाची बाजी मारली होती. आशुतोष काळे ८७, ५६६ मतांनी विजयी झाले होते.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ
Mahayuti Assembly Election 2024 News : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची काय आहे रणनीती?

या निवडणुकीमध्ये काय चित्र असु शकेल?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) भाजपकडून स्नेहलता कोल्हे यांनी तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. मागील पाच वर्षात त्यांनी विविध आंदोलने केलीय, लोकहिताची कामे देखील केलीत. तालुक्यात जनसंपर्क त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. पक्षफुटीनंतर देखील दोन्ही नेते आपापल्या पक्षासोबतच आहेत. तर दुसरीकडे विद्यमान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी देखील तालुक्यात विविध विकाम कामे केली आहेत, तालुक्याचा विकास करत त्यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलंय.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ
Assembly Elections: दादाजी भुसे पाचव्यांदा आमदार होणार की शिंदेंना धक्का बसणार? काय आहे मालेगाव मतदारसंघाचं चित्र?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com