Shirdi Assembly Constituency: शिर्डीत यंदा कोण वाजवणार विजयाचा डंका? सध्या काय आहे राजकीय परिस्थिती, वाचा सविस्तर...

Shirdi Assembly Constituency Vidhan Sabha Election Updates: शिर्डी विधानसभा मतदारसंघावर सध्या भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोण विजयाचा गुलाल फडकवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघ
Shirdi Assembly ConstituencySaam Tv
Published On

मुंबई : शिर्डी विधानसभा मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचं वर्चस्व राहिलंय. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील ७० हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अभय शेळके यांना पराभवाची धूळ चारली होती. राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेसला मात्र शिर्डीत मोठं आव्हान निर्माण झालंय. मात्र विखेंसमोर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं मोठं आव्हान असेल, हे मात्र खरं आहे.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. मात्र त्यानंतर युतीमध्ये बिघाडी झाली आणि संपूर्ण राज्यानं बंडखोरीचं राजकारण पाहिलं. त्यानंतर भाजप, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची महायुती झाली (Maharashtra Politics) होती. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाची महाविकास आघाडी झालीय. त्यामुळे यंदा विधानसभेत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीचा रणसंग्राम पाहायला मिळणार, हे नक्की!

सध्या काय परिस्थिती ?

शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात महाविकास आघाडीकडून कोण रिंगणात उतरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं (Shirdi Assembly Constituency) आहे. सध्या तालुक्यात प्रभावती घोगरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. प्रभावती घोगरे या विखे पाटलांच्या कट्टर विरोधक आहेत. त्यांचे बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्याशी देखील घनिष्ठ संबंध आहे. मागील काही दिवसांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिर्डीमध्ये त्यांच्या घरी दोनदा भेट दिलेली आहे. तर प्रभावती घोगरे यांचे सासरे चंद्रकांत घोगरे यांचे सासरे माजी आमदार राहिलेले आहेत.

यंदा शिर्डीतून विधानसभा निवडणुकीसाठी प्रभावती घोगरे महायुतीकडून रिंगणात उतरतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिर्डीत महायुतीकडून विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे यांच्याच नावाची चर्चा आहे. त्यामुळे शिर्डीत आता राधाकृष्ण विखे विरूद्ध प्रभावती घोगरे, अशी लढत होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता नगरमध्ये सध्या महाविकास आघाडीची सत्ता (Shirdi Vodhan Sabha Election) आहे. त्यामुळे शिर्डीमध्ये महाविकास आघाडीचा विजयाचा डंका वाजणार की, राधाकृष्ण विखे पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघ
Akole Assembly constituency : अकोले मतदारसंघात कोण उधळणार विजयाचा गुलाल? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सामना रंगणार? वाचा सविस्तर

२०१९ ची विधानसभा निवडणूक

शिर्डी विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशी लढत झाली होती.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) १,३१,३१६ मतांनी विजयी झाले होते. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश थोरात यांचा ८७,०२४ मतांनी पराभव झाला होता. यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांचा पराभव करत महाविकास आघाडीने मोठं आव्हान निर्माण केलंय.

२०१४ ची विधानसभा निवडणूक

शिर्डीत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस विरूद्ध शिवसेना अशी चुरशीची लढत झाली होती. तेव्हा काँग्रेस पक्षाचे उमेदवार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील १,२१,४५९ मतं मिळवून विजयी झाले (MVA Vs Mahavikas aghadi) होते. तर शिवसेनेचे उमेदवार अभय शेळके यांचा ७४,६६२ मतांनी पराभव झाला होता. नंतर विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व निर्माण झालं होतं. आता ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असून नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे शिर्डीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोण आमनेसामने राहणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघ
Sangamner Constituency: संगमनेरकरांचा यंदा कौल कोणाला? थोरात आपला गड कायम राखणार की भाजप गुलाल उधळणार? घ्या जाणून

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com