Nana Patole and prakash ambedkar  Saam tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: 'मनाचे खेळ खेळत आहात...' मविआकडून निमंत्रण येताच प्रकाश आंबेडकर संतापले; पटोलेंवर हल्लाबोल

Gangappa Pujari

Maharashtra Politics News:

राज्यातील महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा तिढा काही सुटत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. आज आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची महत्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडत आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र या निमंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर?

"नाना पटोले, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री. रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवार २३ जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात..."

महाराष्ट्रातील युतीसंदर्भात चर्चेचे अधिकार नाहीत..

तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की काँग्रेस हाय कमांडने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत. शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा INDIA आघाडीच्या युतिसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणालेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल गांधी, किंवा खर्गेंनी आमंत्रण द्यावे...

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) व काँग्रेस यांच्या अध्यक्षांच्या सहिनिशी सन्मानपूर्वक निमंत्रण द्या. किंवा श्री. रमेश चेन्नीथाला, श्री. राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी अथवा श्री. मल्लिकार्जुन खरगे यापैकी कोणी वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT