Maharashtra Politics: अखेर शिक्कामोर्तब! महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी निमंत्रण

Mahavikas Aaghadi Meeting: महाविकास आघाडीची लोकसभा जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक मुंबईत पार पडत आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रण पाठवणार असल्याचे सांगण्यात येत होते.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar NewsSaam Tv
Published On

Loksabha Election News:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आज (२५, जानेवारी) महाविकास आघाडीची लोकसभा जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक मुंबईत पार पडत आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रण पाठवणार असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक्स माध्यमावर ट्वीट करत प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण पाठवले आहे.

महाविकास आघाडीची बैठक..

महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच डाव्या पक्षांनाही बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

कॉंग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण...

"देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे. आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकूमशाही विरोधात खंबीरपणे आवाज उठवीत आहात. देश व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकूमशाही विरुध्द लढा देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीतआहेत. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक २५ जानेवारी रोजी होणाऱ्याचर्चेत 'वंचित' आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prakash Ambedkar News
Latur News : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपविले जीवन; लातूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आतापर्यंत ३० जागांचं वाटप झालं असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जो पक्ष‌ जागा जिंकून येतो ती जागा त्या पक्षाला असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणता फॉर्म्युला निश्चित होणार, तसेच वंचित बहुजन आघाडीला कोणाच्या कोट्यातून जागा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar News
Adani Green Energy Project : जनभावनेचा विजय! पाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारला जाणार वीज प्रकल्प रद्द : आमदार प्रकाश अबिटकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com