Cold Wave: थंडीमुळे दररोज सरासरी दोन नागरिकांचा मृत्यू, देशातील २०१३ पासूनची आकडेवारी आली समोर

Death Due To Cold Wave: देशात दरवर्षी थंडीमुळं अनेक जणांचा मृत्यू होतोय. 2013 पासून थंडीमुळे वर्षाला 800 हून अधिक मृत्यू होतोय, अशी माहिती समोर आलीय.
 Cold In India
Cold In India Saam Tv
Published On

Cold Wave India

देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. वाढत्या थंडीमुळं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला (Cold Wave) मिळतंय. उत्तर भारत थंडीच्या लाटेचा सामना करत आहे. दरवर्षी सरासरी 800 हून अधिक लोक थंडीमुळं मरण पावत असल्याचं समोर आलं आहेत. मात्र, वर्षभरात थंडीच्या लाटेच्या दिवसांची संख्या घटली आहे. 2022 मध्ये 2021 पेक्षा कमी थंडी होती, असं सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या पर्यावरणीय सांख्यिकी अहवालात दिसून आलंय. (Maharashtra News)

जेव्हा वास्तविक किमान तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं, तेव्हा मैदानी भागात थंडीच्या लाटा अस्तित्वात असल्याचं म्हटलं जातं. जेव्हा किमान तापमान 2 अंश सेल्सिअसच्या खाली घसरते, तेव्हा तीव्र थंडीची लाट असते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

2022 मध्ये भारतातील 24 राज्यांमध्ये अनुभवलेल्या थंडीच्या लाटांच्या दिवसांची संख्या कमी होती. राज्यांनी 2012 मध्ये एकूण 143 थंडीच्या दिवसांची नोंद केली (Cold Wave) होती. त्यानंतर ते प्रमाण 2018 मध्ये वाढण्यापेक्षा कमी झाले. 2022 मध्ये फक्त 57 दिवस असं वातावरण नोंदवलं गेलं.

थंडीमुळे दररोज सरासरी दोन नागरिकांचा मृत्यू होत असल्याचं समोर (death due to cold) आलंय. 2018 मध्ये 757, 2019 मध्ये 796, 2020 मध्ये 776, 2021मध्ये 618, 2022 मध्ये 720 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

 Cold In India
Cold Wave : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट; तापमान ८ अंश सेल्सिअसवर

थंडीची लाट

2013 ते 2022 दरम्यान जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक थंडीच्या लाटेचे दिवस नोंदवले गेले. 2022 पूर्वी या भागात 85 थंडीच्या दिवसांची नोंद झाली. त्यानंतर हरियाणामध्ये 79 दिवस, याच कालावधीत बिहार 61, उत्तर प्रदेश 56, छत्तीसगड 53 आणि दिल्ली 51 दिवस, थंडीची लाट (death due to cold) होती.

आता उत्तर भारत थंडीच्या लाटेत अडकला आहे. 25 डिसेंबरपासून नागरिक तिथे दाट धुक्याचा सामना करत आहे. बुधवारी, हवामान खात्याने पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि बिहारसह काही उत्तरेकडील राज्यांमध्ये 28 जानेवारीपर्यंत थंडीच्या लाटेचा इशारा (cold wave) जारी केलाय.

 Cold In India
Cold Wave : थंडीचा जोर वाढला; धुळ्यात तापमान ७ अंशावर घसरले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com