Weather Update : दिल्ली गारठली, राज्यातही गारवा कायम; थंडी कधीपर्यंत राहणार?

Waether News Update : आयएमडीने दिल्ली, नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर गुरुग्राम आणि फरीदबारसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Winter Season
Winter Season Saam TV
Published On

Weather News :

देशाची राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे. रविवारी देखील ही थंडी कायम आहे. दिल्ली आणि परिसरात आजही धुक्याचा परिणाम दिसत आहे. आयएमडीने दिल्ली, नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर गुरुग्राम आणि फरीदबारसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.  (Latest Marathi News)

IMD नुसार, 21 जानेवारी रोजी सकाळचे किमान तापमान 9 अंश असण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. कडाक्याच्या थंडीमुळे धुक्याची चादर देखील पसरली आहे. या परिणाम रेल्वे, रस्ते, विमान वाहतुकीवर दिसत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Winter Season
Prakash Ambedkar: 'युती झाली तर सोबत लढू , अन्यथा...'; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

महाराष्ट्रात देखील गारवा कायम आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांच्या वर गेला आहे.मध्य महाराष्ट्रात थंडी आज कायम राहण्याची शक्यता आहे. इतर भागात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

थंडी कधीपर्यंत राहू शकते?

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, मुंबईसह कोकणात 19 ते 23 जानेवारीपर्यंत पहाटेचे किमान तापमान हे 14 अंश तर दुपारचे कमाल तापमान 26 अंश राहू शकते.

Winter Season
Noida Crime News: 100 एकर जमीन, वर्चस्वाची लढाई आणि ५ हत्या; एअरलाइन्सच्या क्रू मेंबरच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात 19 ते 23 जानेवारीपर्यंत पहाटेचे किमान तापमान 14 ते 16 अंश तर दुपारचे कमाल तापमान 28 अंश दरम्यान राहू शकते.

विदर्भात 23 जानेवारीनंतर 3 दिवसांसाठी म्हणजे 25 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल, असा अंदाज खुळे यांनी वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com