Noida Crime News: 100 एकर जमीन, वर्चस्वाची लढाई आणि ५ हत्या; एअरलाइन्सच्या क्रू मेंबरच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

Delhi Air India Crew Member Killing case: दिल्लीतील नोएडाच्या उचभ्रू भागात शुक्रवारी ३२ वर्षीय एअर इंडियाचा क्रू मेंबर सूरज मानची हत्या झाल्याची घटना घडली. या हत्या प्रकरणात पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
Noida crime news
Noida crime news Saam Tv
Published On

Air India Crew Member Killing case:

दिल्लीतील नोएडाच्या उचभ्रू भागात शुक्रवारी ३२ वर्षीय एअर इंडियाचा क्रू मेंबर सूरज मानची हत्या झाल्याची घटना घडली. या हत्या प्रकरणात पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. १०० एकर जमीन,वर्चस्वाची लढाई आणि १५ वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षातून सूरज मानची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून आतापर्यंत ५ हत्या झाल्या आहेत. (Latest Marathi News)

नेमकं काय आहे प्रकरण?

सूरज हा मूळचा दिल्लीच्या नरेला क्षेत्राच्या खेडा खुर्द गावात राहत होता. कुख्यात आरोपी प्रवेश उर्फ सागर मान त्याचा मोठा भाऊ आहे. सध्या तो गाव सोडून नोएडा येथे राहत होता. त्याच्याजवळ कपिलमान उर्फ कल्लूचंही घर आहे.

Noida crime news
Hingoli Crime News : शिक्षकावर काेयत्याने हल्ला, सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल

प्रवेश आणि कपिल सध्या मंडोली जेलमध्ये बंद आहेत. गेल्या १५ वर्षांपासून दोन्ही कुटुंबात संघर्ष सुरु आहे. दोघांमध्ये गावातील १०० जमीनीवरून वाद सुरु झाला होता. या वादावरूनच हत्येचा खेळ सुरु झाला. कपिल गँगने २०१९ मध्ये प्रवेशचा चुलत भाऊ अनिल मानचही हत्या केली होती.

२०२२ मध्ये कपिलच्या वडिलांची हत्या

याच वर्षी प्रवेशचा चुलता वीरेंद्र मानची हत्या करण्यात आली होती. प्रवेशचा मित्र मनीष मानवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याच्यावर १९-२० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मात्र, तो त्यातून थोडक्यात बचावला. तर प्रवेश मान गँगने २०२२ साली कपिलच्या वडिलाची हत्या झाली. तर याआधी २०१७ साली कपिलचा चुलता सूर्य प्रकाश बबलूची हत्या झाली होती.

Noida crime news
Mumbai Crime News: सोशल मीडियावरील ओळख, पबमध्ये भेटताच घात झाला; मुंबईत २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार

हत्या प्रकरणात दोघांना अटक

सूरजची हत्या कपिलच्या वडिलांच्या हत्येच्या बदल्यात केली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या हत्येचा खुलासा केला आहे. यासाठी २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. तसेच या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com