Cold Wave : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट; तापमान ८ अंश सेल्सिअसवर

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये तापमानात कमालीची घट आली असून तोरणमाळ येथे ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Nandurbar Cold Wave
Nandurbar Cold WaveSaam tv

सागर निकवाडे

नंदुरबार : यंदा उशिराने हिवाळ्याची चाहूल लागली. यात दरवर्षीप्रमाणे यंदा थंडी जाणवली नाही. मागील (Nandurbar) महिन्यात चार- पाच दिवसच काहीसा थंडीचा तडाखा जाणवला होता. यानंतर आता मागील तीन- चार दिवसांपासून थंडी जाणवू लागली असून नंदुरबार  जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रांगांमध्ये तापमान ८ वंशावर खाली आले आहे.  (Tajya Batmya)

Nandurbar Cold Wave
Bus Accident : बस- ट्रॅक्टरचा अपघात; चालकाचा मृत्यू, प्रवाशी जखमी

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये तापमानात कमालीची घट आली असून तोरणमाळ येथे ८ अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम मानवी जन जीवनावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे कडाक्याच्या थंडीसह (Cold Wave) सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये दाट असे धुके दिसून येत आहे. धुके असल्यामुळे दव देखील पडलेले पाहण्यास मिळत आहे. यात वाऱ्याची झुळूक असल्याने सकाळी १० वाजेपर्यंत गारठा जाणवत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar Cold Wave
Papaya Price : पपई दराचा प्रश्न चिघळला; नंदुरबार जिल्ह्यात बैठकीला व्यापारी उपस्थित नसल्याने तणाव

आणखी ८ दिवस थंडी 

नंदुरबार जिल्ह्यात अजून आठ दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज हवामान खात्याच्यावतीने व्यक्त करण्यात आलेला आहे. एकूणच सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये खालवलेल्या तापमानाचा परिणाम मानवी जन जीवनावर झाला असून थंडीपासून रक्षणासाठी शेकोटीनचा आधार घेतला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com