Bus Accident : बस- ट्रॅक्टरचा अपघात; चालकाचा मृत्यू, प्रवाशी जखमी

Manmad News : नाशिकच्या चोंडी घाटाजवळ बस व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्यावर सर्वत्र कांदा फेकला गेला
Bus Accident
Bus AccidentSaam tv

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मनमाड- मालेगाव महामार्गावर मनमाडहून नंदूरबारकडे जात (Manmad) असलेली एसटी बस व कांद्याने भरलेल्या ट्रॅकरचा अपघात (Accident) झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

Bus Accident
PM Narendra Modi Inaugurates Atal Setu | पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत अटल सेतूचं लोकार्पण

नाशिकच्या चोंडी घाटाजवळ बस व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्यावर सर्वत्र कांदा (Onion) फेकला गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचत त्यांनी अधिक तपास सुरु केला आहे. सकाळच्या सुमारास मनमाडला कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर जात असताना हा अपघात झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bus Accident
Exam Center: १०वी आणि १२वी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांसाठी मोठी बातमी; या नियमांचं पालन न केल्यास अनुदान थांबणार

ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू 

अपघात होऊन जोरदार धडक बसल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक हा कानडगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तर बस चालक- वाहकासह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com