Papaya Price : पपई दराचा प्रश्न चिघळला; नंदुरबार जिल्ह्यात बैठकीला व्यापारी उपस्थित नसल्याने तणाव

Nandurbar News : पपई उत्पादनासाठी सर्वात मोठा जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. देशभरातील व्यापारी पपई खरेदीसाठी नंदुरबार येथे येत असतात.
Papaya Price
Papaya PriceSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : सुरवातीच्या हंगामात पपईला चांगला दर मिळाला. मात्र आता कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची (Farmer) अडचण होत आहे. यामुळे दर निश्चित करण्यासाठी व्यापारी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची बैठक बोलावण्यात आली होती. (Nandurbar) मात्र बैठकीला व्यापारीच उपस्थित नसल्याने तणाव निर्माण झाला असून पपई दराचा प्रश्न चिघळल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Live Marathi News)

Papaya Price
PM Narendra Modi : १३ महिने ७ दौरे; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यांचा अर्थ काय?

पपई उत्पादनासाठी (Papaya Crop) सर्वात मोठा जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. देशभरातील व्यापारी पपई खरेदीसाठी नंदुरबार येथे येत असतात. मात्र यावर्षी व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पपईचे दर कमी करण्यात आले आसल्याचा आरोप आहे. हंगामाच्या सुरुवातीला पपईला २५ रुपये प्रति किलोचा दर देण्यात आला होता. आता हा दर थेट पाच ते सहा रुपये प्रति किलोवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Papaya Price
Bus Accident: बस- ट्रॅक्टरचा अपघात; चालकाचा मृत्यू, प्रवाशी जखमी

आजपासून पपई तोड बंद 

पपईच्या दर ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि व्यापारी व पपई उत्पादक शेतकरी यांची एक बैठक लावण्यात आली होती. या बैठकीला व्यापारी उपस्थित नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व पपई उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आजपासून जिल्ह्यातील पपई तोड बंद करण्यात आल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com