Red Chilli Market : तीन दिवसांच्या सुट्ट्यानंतर मिरची खरेदीला सुरुवात; नंदुरबार बाजार समितीत ४०० वाहनातून आवक

Nandurbar News : नंदुरबार बाजार समितीमध्ये आतापर्यंत २ लाख २५ हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली असून हा हंगाम मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहेत.
Red Chilli Market
Red Chilli MarketSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी अशी आवक होत असून तीन दिवसाच्या (Nandurbar) सुट्ट्यानंतर बाजार समितीत ३०० ते ४०० वाहनातून मिरचीची आवक झाली आहे.  दिवसानंतर मिरची खरेदीला सुरवात झाली आहे. (Live Marathi News)

Red Chilli Market
RTO Action : सावधान! अल्पवयीन बाईकस्वारासह आता पालकांवरही होणार कारवाई; गत वर्षात २० जणांवर झाली कारवाई

नंदुरबार बाजार समितीमध्ये आतापर्यंत २ लाख २५ हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली असून हा हंगाम मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहेत. आणखीन जवळपास एक लाख क्विंटल मिरचीची आवक होण्याची शक्यता असून यावर्षी तीन लाख क्विंटल मिरची खरेदीच्या टप्पा ओलांडला जाणार असल्याची शक्यता (Bajar Samiti) मार्केट कमिटीद्वारे वर्तवण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Red Chilli Market
Nashik Crime : चाकूने वार करत जमीन व्यावसायिकाची हत्या; चांदवड तालुक्यातील घटना

यंदा बाजार समितीत अपेक्षेपेक्षा जास्त मिरचीची आवक होत आहे. आवक जास्त असल्यामुळे मिरचीचे भाव घसरले असून नंदुरबार बाजार समितीत ओली लाल मिरचीला २ हजारपासून ४ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. भाव उतरले असल्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांमध्ये नारीजीच्या वातावरण पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com