Cold Wave : थंडीचा जोर वाढला; धुळ्यात तापमान ७ अंशावर घसरले

Dhule News : मकरसंक्रांतीनंतर थंडीचा जोर कमी होऊन तापमानात हळूहळू वाढ होत असते. मात्र यंदा उशिराने थंडीची चाहूल जाणवू लागल्यानंतर मकरसंक्रांतीनंतर थंडी वाढली आहे.
Cold Wave
Cold WaveSaam tv
Published On

धुळे : उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम जाणवत असून मागील काही दिवसांपासून तापमानात (Temperature) घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे धुळ्यातील (Dhule) तापमान घसरून ७ अंश सेल्सिअसवर खाली आले आहे. (Tajya Batmya)

Cold Wave
Washim News : शेतशिवरातून २०० हुन अधिक स्प्रिंकलर तोट्यांची चोरी; भापुर शिवारातील शेतकऱ्यांचे नुकसान

मकरसंक्रांतीनंतर थंडीचा जोर कमी होऊन तापमानात हळूहळू वाढ होत असते. मात्र यंदा उशिराने थंडीची चाहूल जाणवू लागल्यानंतर मकरसंक्रांतीनंतर थंडी वाढली आहे. उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा हा परिणाम जाणवत आहे. यामुळे सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. धुळ्यात देखील गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. आज धुळ्यामध्ये ७ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. (Cold Wave) तापमानाचा पारा घसरल्यामुळे धुळ्यात थंडीचा अनुभव धुळेकरांना घेता येत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cold Wave
Sambhajinagar Crime : अल्पवयीन बांग्लादेशी मुलीकडून वेश्याव्यवसाय; तिघे जण गजाआड

आणखी काही दिवस थंडीचा जोर 

घराबाहेर निघताना धुळेकरांना या हाड गोठवणाऱ्या थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी गरम व उबदार कपडे परिधान करावे लागत आहेत. त्याचबरोबर शेकोटीचा देखील आधार घ्यावा लागत आहे. हाड गोठवणाऱ्या थंडीमुळे सकाळी रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट बघावयास मिळत असून, नागरिक सकाळी उशिरा घराबाहेर पडणं पसंत करत आहेत. यापुढे देखील तापमानामध्ये अशाच प्रकारे आणखी काही दिवस घट बघावयास मिळणार असल्याचा हवामान विभागातर्फे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com