कोल्हापुरातील इचलकंरजी येथून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर आईचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
माय-लेकाच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय तर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. (Live Marathi News)
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात मंगळवारी रात्री मुलगा प्रीतम तेरदाळे (३० वर्ष) आणि आई शोभा तेरदाळे (५४ वर्ष) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने एकाच वेळी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी मळा परिसरातील राहणारा प्रीतम तेरदाळे हे रात्री आपल्या दारात मोबाईल बघत बसला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रीतमच्या अचानक छातीत दुखू लागलं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. हेच पाहताना प्रीतमची आई शोभा यांनाही त्याचवेळी हृदयविकाराचा झटका आला. यात दोघांचाही दुर्दैव मृत्यू झाला आहे.
एकाच वेळी मुलगा आणि आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने पुजारी मळा परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.