Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्यामुळं कंटेनरला धडक, तिघांचा मृत्यू

Travels Accident On Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. पुन्हा एकदा महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
Samruddhi Highway Accident
Samruddhi Highway AccidentSaam Tv
Published On

Samruddhi highway Travels accident

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) नेहमीच अपघात होत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही थांबत नसल्याचं चित्र आहे. महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे. सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री झाल्याचं समोर येत आहे. आता पुन्हा एक भीषण अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे.  (Live Marathi News)

समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरतोय. नेहमीच होणाऱ्या भीषण अपघातांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. समृद्धी महामार्गावर आज (Samrudhhi Highway Accident) पहाटे अपघात झालाय. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रॅव्हल्स चालकाची कंटेनरला धडक

ही ट्र्रॅव्हल अहमदनगरहून रायपूरकडे जात होती. तेव्हा खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागली आणि अपघात (Samruddhi Highway Accident) झाला. सकाळी ५ वाजता दरम्यान हा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यानं बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने अपघात झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात आहे. यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत (Samruddhi Highway) आहे. अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या संदर्भात अधिक तपास सद्या तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.

Samruddhi Highway Accident
Yavatmal Accident : वणी- मारेगाव मार्गावर कार- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

अपघातानंतर चालक पसार

या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात (Samruddhi Highway Accident) आलंय. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल चालक घटनास्थळावरून पसार झालाय. या संदर्भात अधिक तपास तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.

समृद्धी महामार्ग अपघातांमुळे नेहमी चर्चेत असतो. समृद्धी महामार्गावर सुरक्षितपणे वाहने चालवणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी मोठ्या प्रमाणात काळजी घ्यायला हवी. या महामार्गावर आतापर्यंत जवळपास 1 हजारपेक्षा जास्त अपघात (Accident) झाले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांचा मृत्यू झालाय.

Samruddhi Highway Accident
Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गानजीक बस- ट्रकचा अपघात; १५ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com