Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गानजीक बस- ट्रकचा अपघात; १५ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

सर्व जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णलयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
Buldhana Accident News, samruddhi mahamarg, mehkar
Buldhana Accident News, samruddhi mahamarg, mehkar Saam Tv

Buldhana News : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (samruddhi mahamarg) पूलाच्या खालच्या बाजूस आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बसची (msrtc bus) आणि वाळूच्या ट्रकची धडक झाली. या अपघातात (accident) बस मधील १५ प्रवासी जखमी (passengers injured) झाले आहेत. जखमीमधील ३ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Breaking Marathi News)

Buldhana Accident News, samruddhi mahamarg, mehkar
Mahila Maharashtra Kesari Spardha : मीच मैदान मारणार ! पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची आज अंतिम लढत

मेहकर जवळ समृद्धी महामार्गाच्या पूलाच्या खालच्या बाजूने एसटी महामंडळाची बस खामगावकडून मेहकरच्या दिशेने निघाली हाेती. या बसची वाळू वाहतुक करणा-या ट्रकशी धडक झाली. ही धडक इतकी जाेरदार हाेती की बसचा पुढचा भागाच्या काचेला तडा गेला.

Buldhana Accident News, samruddhi mahamarg, mehkar
Uncut Udayanraje Bhosale : आम्हांला आया बहिणींवरुन काेणी शिव्या दिल्या नाहीत..., असे लाेक एवढ्या माेठ्या घराण्यात जन्माला आले कसे ? : उदयनराजे (पाहा व्हिडिओ)

हा अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवासी रस्त्याच्या कडेला बसून राहिले. यावेळी या मार्गावरुन जाणा-या नागरिकांनी जखमींना धीर दिला. या अपघातात बस मधील १५ प्रवासी जखमी झाले. या जखमींमध्ये ३ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्व जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णलयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com