नवाब मलिकांच्या महायुतीतील प्रवेशावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिकांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहत मलिकांना महायुतीत घेणे शक्य नसल्याचे सांगितले. फडणवीसांच्या भूमिकेवर टीका करताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात भाजपने घेतलेल्या भूमिकेवरुन संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. "ड्रग्स रॅकेटमध्ये राज्याचे २ मंत्री सहभागी आहेत, सरकारने कारवाई केली का? ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणातील मंत्र्यांवर कारवाई केली का ? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच मलिक चालत नाहीत, मग पटेल कसे चालतात?" असेही राऊत यावेळी म्हणाले.
"ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिकांवर आहेत. तेच आरोप प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावरही आहेत. मग फडणवीसांनी त्यांना पत्र का लिहले नाही? भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक नाही. त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट केले पाहिजे, ते फक्त ढोंग करत आहेत.." असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
फोटो पोस्ट करत टीकास्त्र...
दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर नवाब मलिक आणि प्रफूल पटेल यांचा फोटो पोस्ट करत जोरदार टीका केली आहे. या फोटोला त्यांनी "ऐसी बात बोलिए, के कोई न बोले झूठ… और ऐसी जगह बैठिए, के कोई न बोले उठ..." असा कॅप्शन देत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. थोडक्यात राज्याचे हिवाळी अधिवेशन महत्वाच्या प्रश्नांपेक्षा राजकीय आरोप- प्रत्यारोपांमुळेच चर्चेत आल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.