Maharashtra Politics On Nawab Malik: नवाब मलिक बसले सत्ताधारी बाकावर, रोहित पवारांना वेगळीच शंका

Maharashtra Politics On Nawab Malik: नवाब मलिक थेट सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्यामुळे अजित पवार गटाची चांगलीच पंचाईत झाली. यावरून राज्याच राजकारण चांगलच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संघर्ष यात्रेदरम्यान नवाब मलिक यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.
Maharashtra Politics On Nawab Malik
Maharashtra Politics On Nawab MalikSaam Digital
Published On

Maharashtra Politics On Nawab Malik

विधिमंडळ अधिवेशनात नवाब मलिक थेट सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्यामुळे विरोधकांनी अजित पवार गट आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावरून सध्या राज्याच राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संघर्ष यात्रेदरम्यान नवाब मलिक यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे. नवाब मलिक यांच्यावरील आरोप खोटे आहेत, मात्र त्यांची काहीतरी अडचण असावी, त्यामुळे ते विरोधी बाकावर बसले असावेत, अशी शंका उपस्थित केली केली आहे.

नवाब मलिक तटस्थ भूमिका मनात ठेऊन जर सत्ताधारी बाकावर बसले असेल तर तो त्यांचा त्यांचा विषय आहे. मात्र नवाब मलिक यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत, ते राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यावर केलेले आरोप आहे. तरीही नवाब मलिक यांना कदाचित काही अडचणी असाव्यात म्हणून त्यांना सत्ताधाऱ्यांविरोधात भूमिका घेता येत नसावी, असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहित पवार यांची संघर्ष यात्रा पवनार येथील विनोबा भावे यांच्या आश्रमात दर्शन घेऊन सेलूमार्गे नागपूरला रवाना झाली. विनोबा भावे यांच्या आश्रमात अभिवादन करत रोहित पवार यांनी आश्रम व्यवस्थापनांशी चर्चा केलीय. यानंतर ते सेलूकडे रवाना झाले. सेलू येथून आज ते हे नागपूर जिल्ह्याकडे जातं आहेत. आतापर्यंत या पदयात्राने 750 किलोमीटरचा अंतर पार केला आहे. 12 नोव्हेंबरला या यात्रेचा नागपूरला समारोप होणार आहे.

Maharashtra Politics On Nawab Malik
Maharashtra Politics : अखेर पडदा पडला! नवाब मलिकांबद्दल अजित पवार गटाची थेट भूमिका

मलिक प्रकरणावर फडणवीस-शिंदे एकत्र

मलिक प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेला एकनाथ शिंदेंनीही पाठिंबा दिला आहे. आघाडीच्या घटकपक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या-त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना ही आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे, असे शिंदे म्हणाले. जनहिताचा आणि लोकभावनेचा आदर करून अजित पवार योग्य भूमिका घेतील, असेही शिंदे म्हणाले.

प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार

राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे आम्ही २ जुलै रोजी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही सरकारसोबत गेलो. या सर्व राजकीय घटनांनंतर मलिक पहिल्यांदाच सभागृहात आले. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचे मत ऐकल्यानंतर मी त्याच्यावर बोलेन, असे अजित पवार म्हणाले.

फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राला रिप्लाय देणार का, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर पत्राबद्दल काय करायचं ते माझं मी करेल. सगळ्या मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही, असे पवार म्हणाले.

Maharashtra Politics On Nawab Malik
Vijay Wadettiwar News: ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक, सरकारला धारेवर धरलं; सभागृहात काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com