Maharashtra Politics : अखेर पडदा पडला! नवाब मलिकांबद्दल अजित पवार गटाची थेट भूमिका

Nawab Malik, Maharashtra Political News Update : नवाब मलिक यांच्याशी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
Nawab Malik, Ajit Pawar, Praful Patel, Maharashtra Political News Update
Nawab Malik, Ajit Pawar, Praful Patel, Maharashtra Political News UpdateSAAM TV
Published On

सूरज मसूरकर, नागपूर | 8 डिसेंबर 2023

Praful Patel on Nawab Malik :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे विधीमंडळात सत्ताधारी बाकावर बसल्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये पडलेली वादाची ठिणगी, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून मांडलेली भूमिका, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या भूमिकेचे केलेले समर्थन या सर्व राजकीय घडामोडींनंतर अखेर मलिक प्रकरणावर अजित पवार गटाने थेट भूमिका मांडली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याशी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे (Ajit Pawar) वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांमुळं जामीन मिळाला आहे. ते काल, गुरुवारी विधानभवनात आले. ते आमचे सहकारी होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असेही प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Winter Session)

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या यादीतही मलिकांचे नाव नाही!

प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. निवडणूक आयोगाकडे आमदारांची यादी दिली आहे, त्यातही आम्ही मलिक यांचे नाव दिलेले नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत. मलिक यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. ते आमचे सहकारी असून, त्यांच्या तब्येतीची माहिती आम्ही घेतली. त्यांचे स्वागत केले, असे पटेल म्हणाले.

Nawab Malik, Ajit Pawar, Praful Patel, Maharashtra Political News Update
Maharashtra Politics: 'सत्तेपेक्षा देश महत्वाचा..' नवाब मलिकांना महायुतीत 'नो एन्ट्री'; फडणवीसांचे अजित पवारांना पत्र

मुस्लीम समाजाच्या मतांसाठी आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारधारेचा आहे. त्याच्यामुळे सर्व समाजांसाठी एकत्र येऊन आम्ही प्रश्न मांडतो. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर विरोधक हताश झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे आरोप-प्रत्यारोप त्यांच्याकडून केले जात आहेत, असा हल्लाबोलही पटेल यांनी केला.

माझ्यावरही आरोप केले जातात. त्याच्यावर शरद पवार यांनी आधीच उत्तर दिले आहे. माझ्यावरील आरोपांवर मी यापूर्वीही स्पष्टीकरण दिलेले आहे, असेही पटेल यांनी सांगितले.

Nawab Malik, Ajit Pawar, Praful Patel, Maharashtra Political News Update
Ajit Pawar On Nawab Malik : त्या पत्राबद्दल काय करायचं ते माझं मी करेन; फडणवीसांच्या 'लेटर'वरील प्रश्नावर अजित पवार रोखठोक बोलले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com