Uttam Jankar On Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजितदादा वाघ होते पण त्यांची नखं भाजपने काढली, उत्तम जानकरांची बोचरी टीका

Uttam Jankar Criticized Ajit Pawar: 'अजित पवार हे फितूर माणूस निघाले. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राबतायत.', अशी जळजळीत टीका उत्तम जानकर यांनी केली आहे.

Priya More

भारत नागणे, सोलापूर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांचा आरोपप्रत्यारोप सुरूच आहे. अशात उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला.

'अजित पवार हे फितूर माणूस निघाले. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राबतायत.', अशी जळजळीत टीका उत्तम जानकर यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'अजितदादा यांच्यात धैर्य नाही , तपश्चर्या नाही. अजितदादा वाघ होते भाजपने त्यांची नखं काढून घेतली आहेत. दादा वाघाची शेळी झाली आहेत. म्हातारपणात गुलाबी साडी नेसणे म्हणजे चुकीचे आहे. तरुणपणातच साडी नेसायला पाहिजे होती. आता काय उपयोग.' असा टोलाही जानकर यांनी लगावला.

राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा देखील अंदाज उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे. 'राज्यात महाविकास आघाडीला २०० च्या जागा मिळतील तर अजितदादांच्या फक्त ५ -६ आमदार निवडून येतील. एकनाथ शिंदे यांचे १०-१२ आमदार निवडून येतील. तर भाजपचे ४०-५० आमदार निवडून येतील.' असा दावा ही जानकर यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला 'साम'वर, 6 विधानसभेसाठी ठाकरे बंधूंचा मास्टरप्लॅन

Shahi Tukda Recipe: संध्याकाळी काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा हॉटेल स्टाईल शाही तुकडा

Maharashtra Live News Update: ⁠- नाशिक पोलिस मुंबईच्या वेशीवर दाखल

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

SCROLL FOR NEXT