Maharashtra Politics : 'शपथविधीपूर्वीच्या बैठकीला पवार-अदानींचीही हजेरी'; पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट,VIDEO

ajit pawar political News :विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अजित पवारांनी पुन्हा पहाटेच्या शपथविधीविषयी नवा खुलासा केलाय.. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीच्या प्रकरणात अदानींची एण्ट्री झालीय..तर या बैठकांमागची इनसाईड स्टोरीच पवारांनी सांगितलीय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Ajit Pawar Net Worth
Ajit Pawar Net WorthSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय..,रोज नवनवे आरोप-प्रत्यारोप होतायत....मात्र अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीच्या जुन्या मुद्यावर नवा मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीला अमित शाहांसह गौतम अदान आणि शरद पवारांनीही उपस्थिती लावल्याचा मोठा दावा अजित पवारांनी केलाय. नेमकं काय म्हणाले अजित पवार पाहूयात....

पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट?

राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार आणण्यासाठी दिल्लीत 5 बैठका

बैठकीला पवार, अदानी, शाह, पटेल, फडणवीस हजर असल्याची माहिती

बैठकीत भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा झाल्यानंतर सर्व ठरलं होतं

शरद पवारांनी नंतर निर्णय बदलल्याने सर्व दोष माझ्यावर आला

पहाटेच्या शपथविधीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आणि इतर नेत्यांना वाचवलं

Ajit Pawar Net Worth
Sharad Pawar: 4 महिन्यात मविआचं सरकार येणार, शरद पवार यांचा दावा

अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर खुद्द शरद पवारांनीच साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट एक्सक्लूसिव मुलाखतीत पहाटेचा शपथविधी, अमित शाह आणि अदानींसोबतच्या दिल्लीतल्या भेटीची इनसाईड स्टोरीच सांगितलीय.

Ajit Pawar Net Worth
Ajit Pawar : अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; पहाटेच्या शपथविधीवरून नेमकं काय सांगितलं?

एवढंच नव्हे तर उद्योगपतींच्या राजकारण्यांशी होणा-या भेटीगाठीवरही पवारांनी भाष्य केलं. उद्योगपतींच्या राजकीय निर्णय़ प्रक्रियेतला सहभाग मात्र त्यांनी फेटाळून लावला. सामच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत उद्योगपतींबाबत नेमकं काय सांगितलं ते पाहूयात...

Ajit Pawar Net Worth
Sharad Pawar : 'लोकशाहीचा हा मोठा विजय...'; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर शरद पवार काय म्हणाले?

मोदी सरकार अदानी आणि अंबानी हे उद्योगपती चालवत असल्याची टीका राहुल गांधी वारंवार करत असतात. त्यातच अजित पवारांच्या दाव्याने गांधींच्या दाव्याला पुष्टीच मिळाल्याची चर्चा यानिमित्तानं रंगलीय. त्यामुळे निवडणुकीच्या आधी अजित पवारांनी केलेला पहाटेच्या शपथविधीमागे अदाणी असल्याचा गौप्यस्फोट भाजपची अडचण वाढवणारा ठरणार की पवारांची कोंडी करणारा? हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com