Sharad Pawar News : 'शरद पवार जातीयवादी आहेत', या विरोधी पक्षाच्या आरोपावर पवारांचं प्रत्युत्तर
शरद पवार जातीयवादी आहेत, असा आरोप सतत छगन भुजबळ, राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर करत असतात या आरोपावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. 'एखादं वाक्य उगच अंदाजे ठोकून द्यायचं, पुन्हा पुन्हा टेक बोलायचं, म्हणजे इतक्या वेळा कोणी एकच बोलत असेल तर लोकांना देखील त्यात काही तथ्य आहे असं वाटायला लागतं. बाकी यात काहीही तथ्य नाही', असं यावेळी बोलताना पवार यांनी म्हंटलं आहे. माझ्या नेतृत्वाखाली जेव्हा पक्ष चालत होता, काही काळ राज्याचं सरकार देखील माझ्या नेतृत्वात चाललं आहे. तेव्हाचे आमचे निर्णय बघितले, तर आम्ही सर्व घटकांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे काहीही मूर्खासारखं बोलून फक्त आरोप करायचे एवढाच या मागे ठाकरे आणि भुजबळांचा हेतू असल्याचं देखील, पवारांनी मुलाखतीतून सांगितलं.
एका कार्यक्रमात शरद पवार यांनी पुणे टोपी न वापरता फुले टोपी वापरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर जातीयवादी म्हणून विरोधकांनी टीका केली होती. याविषयी देखील शरद पवार यांनी मुलाखतीतून स्पष्टीकरण दिलं. 'तो कार्यक्रम कोणता होता हे आधी टीका करणाऱ्यानी बघायला हवं होतं. तो फुलेंचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तिथे फुले टोपी घालण्याचं आवाहन केलं होतं. मला स्वत:ला त्या कार्यक्रमात फुलेंची टोपी घातली. महात्मा फुले यांच्या पूर्ण जीवनाचा अर्थच सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा आहे. त्यामुळे मी त्यांचे विचार आचरणात आणायला सांगितले, त्यांचा पेहेराव करायला सांगितलं म्हणजे मी जातीयवादी आहे, या आरोपला काहीही तथ्य नाही', असं यावेळई बोलताना शरद पवार यांनी सांगितलं.
Edited By Rakhi Rajput
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.