Sharad Pawar : 'लोकशाहीचा हा मोठा विजय...'; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर शरद पवार काय म्हणाले?

Sharad Pawar News : सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकशाही हा मोठा विजय आहे, अशा शब्दात शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam Digital
Published On

Sharad Pawar News:

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणावर निकाल दिला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याच याचिकेवर आज सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकशाही हा मोठा विजय आहे, अशा शब्दात शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर 'एक्स' या सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. हा मतदारांचा विजय आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले. मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय!, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar
Lok Sabha Election: सपाचा काँग्रेसला चकवा? अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर

'आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे अंतिम मुद्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी आम्हाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार’ म्हणून मान्यता दिली आहे. ECI ला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर ७ दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

'लोकशाहीचा हा मोठा विजय आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानासाठी आम्ही लढत राहू. सत्यमेव जयते, असेही त्यांनी सांगितले.

Sharad Pawar
Smriti Irani Challenge: स्वत:वर विश्वास असेल तर अमेठीतून निवडणूक लढवा, स्मृती इराणींचे राहुल गांधींना चॅलेंज

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या , 'आज सुप्रीम कोर्टात शरद पवार यांनी पक्ष चिन्ह द्यायचं नाही, असा युक्तीवाद अजित पवारांच्या वकिलाने केला. या मुद्द्यावर वकील १०-१५ मिनिटं वाद घालत होते.'त्यांना कोर्टाने असं होऊ शकत नाही. शरद पवारांना पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं पाहिजे. चुकीचा हट्ट धरू नये, असंही कोर्टाने म्हटलं. कोर्टाने स्पष्ट केलं आहे की,'आता अजित पवार यांना पक्ष चिन्ह दिलं आहे, ती फायनल ऑर्डर नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com