Smriti Irani Challenge: स्वत:वर विश्वास असेल तर अमेठीतून निवडणूक लढवा, स्मृती इराणींचे राहुल गांधींना चॅलेंज

Smriti Irani Challenge To Rahul Gandhi: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिले आहे.
Smriti Irani Challenge To Rahul Gandhi
Smriti Irani Challenge To Rahul GandhiSAAM TV
Published On

Smriti Irani Challenge To Rahul Gandhi:

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिले आहे. एनडीटीव्हीशी बोलताना इराणी म्हणाल्या की, राहुल यांना स्वत:वर विश्वास असेल तर त्यांनी अमेठीतून निवडणूक लढवून दाखवावे.

त्या म्हणाल्या की, '2019 मध्ये त्यांनी अमेठी सोडले आणि आज अमेठीने त्यांना सोडले. त्यांना स्वत:वर विश्वास असेल तर त्यांनी वायनाडला न जाता अमेठीतून निवडणूक लढून दाखवावी. राहुल यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशात दाखल होत असताना इराणी यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. यातच स्मृती इराणी या आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Smriti Irani Challenge To Rahul Gandhi
Lok Sabha Election: सपाचा काँग्रेसला चकवा? अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर

स्मृती इराणी म्हणाल्या, ''अमेठीचे रिकामे रस्ते ते दाखवतात की, त्यांना राहू गांधी यांच्याबद्दल काय वाटतं,'' सोनिया गांधी यावेळी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्या राज्यसभा निवडणुकीत उभ्या आहेत. आता प्रियांका गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. (Latest Marathi News)

याचबाबत भाजपची काय तयारी आहे? असा प्रश्न स्मृती इराणींना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, ''रायबरेलीमधून कोण प्रतिनिधी असेल हे फक्त हे संसदीय मंडळच सांगू शकते. मी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, रायबरेलीमध्ये भूकंप होणार आहे. रायबरेलीची जागा गांधी घराणे स्वतःच्या इच्छेने सोडतील, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. हे पराभवाचे पहिले लक्षण आहे.''

Smriti Irani Challenge To Rahul Gandhi
NCP Crisis Hearing : 'चुकीचा हट्ट धरू नका', न्यायालयात काय घडलं? सुप्रिया सुळेंनी सांगितला राष्ट्रवादी फुटीच्या सुनावणीतील एक-एक शब्द

दरम्यान, उत्तर प्रदेशात अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा स्मृती इराणी यांनी सुमारे 55,000 मतांनी पराभव केला होता. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. हे राज्य संसदेत सर्वाधिक खासदार पाठवते. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला यूपीमधून केवळ एक जागा जिंकता आली होती. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या. अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव झाला, मात्र केरळमधील वायनाडमध्ये ते मोठ्या फरकाने विजयी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com