Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी टीका केली. भाजप कार्यकर्त्यांनीही सत्तार यांना हरवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ठाकरेंनी केलेय.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsUddhav Thackeray News
Published On

Uddhav Thackeray News : आपले मतभेद असतील, त्यासाठी कुणाला बोलायचं असेल तर बोलू, अशी साद उद्धव ठाकरे यांनी भाजपला घातली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड येथे जाहीर सभेत बोलत होते. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक भाषण करताना ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याची आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी टीका केली. भाजप कार्यकर्त्यांनीही सत्तार यांना हरवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ठाकरेंनी केलेय.

भाजपला विनंती. आपले मतभेद असतील. आपण त्यासाठी कुणाला बोलायला लागेल तर बोलू. त्यासाठी मी बोलायला तयार आहे. पण त्या अगोदर सिल्लोडला लागलेला कलंक दूर करायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सिल्लोडच्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. मला आज वेगळेच वाटले. आज बॅग तपासायला कोणी आलेच नाही. गेल्यावेळी लोकसभेत तुम्ही करून दाखवले. याही वेळेस केल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. अनेकजण गर्दी जमवण्यााठी प्रयत्न करतात. काल सुद्धा मुंबईत खूप गर्दी करण्यासाठी प्रयत्न झाले, अशी बोचरी टीका ठाकरेंनी केली.

सिल्लोडमधील हुकुमशाही, गुंडागर्दी कमी करायला मी येथे आलोय. बनकर यांचे भाषण बघा. गद्दरांचे भाषण बघा, ते कसे बोलतात. सिल्लोडमधल्या गद्दाराने टीव्ही कॅमेऱ्यासमोर सुप्रिया ताईंना शिवीगाळ केली. तोच गद्दार काल मोदींच्या सभेला व्यासपीठावर होते. सुप्रिया ताईला शिवीगाळ करणाऱ्यासाठी प्रचारासाठी आले होतात का? असे मला मोदींना विचारायचं आहे, असा प्रश्ना ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरेंचा सत्तारांना टोला, भाजपला विनंती, जहरी टीका -

गद्दार सत्तार यांनी अनेकांचे प्लॉट बळकावले, जमिनी लुटल्या. सैनिकांच्या जमीनी लुटल्या. आपले सरकार आल्यावर याची सगळी चौकशी करु. हे सगळं किती काळ सहन करणार. किती मस्ती. याला मंत्रिपद दिले. पण इतके हावरट. नुसते खातात. तुम्ही जर सत्तेचा वापर करून गरीबांना छळत असाल तर आमची सत्ता आल्यावर तुरुंगात टाकू. गोर गरीबांची यांनी झोप उडवली. आता सर्वसामान्य माणूस एक झाला पाहिजे. मी भाजपच्या लोकांना सांगतोय ही संधी सोडू नका. सच्चा भाजपच्या कार्यकर्ता इथली गुंडागर्दी संपवल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरेंनी भरसभेत सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com