Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार; शिंदेंनी दावा सोडला?

Maharashtra Next CM Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Priya More

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात भाजपचा जो निर्णय असेल तो मान्य आहे. त्यांच्या निर्णयाला माझा, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असे जाहीर करतानाच, मुख्यमंत्रि‍पदाचा दावा सोडल्याचे संकेत एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महायुतीला २३० जागा मिळवण्यात यश आले. यापैकी १३२ जागा भाजपने जिंकल्या. हे लक्षात घेता भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी चर्चा सुरू होती. तसंच, भाजपच्या नेत्यांनी आणि महायुतीमधील नवनिर्वाचित आमादारांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला.

भाजपकडून देखील मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असतील असे सांगण्यात आले होते. फक्त घोषणा करणे बाकी राहिले आहे. अशामध्ये आता एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पीएम मोदी जो निर्णय घेतील ते मान्य आहे असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता महायुतीकडून याबाबत अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Beed News : बांधकाम करताना तोल गेला अन् आक्रीत घडलं, बीडमध्ये २५ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

Gold Rate Fall : सोनं स्वस्त झाले रे! आठवडाभरात किंमत ₹१९०० घसरली, वाचा २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Personal Loan चा अर्ज करताना बँक Blank cheque का मागते? काय आहे नियम, जाणून घ्या सर्वकाही

SCROLL FOR NEXT