Ajit Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विदर्भात मोठा राजकीय भूकंप, बड्या नेत्याने सोडली काँग्रेसची साथ, शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

NCP Ajit Pawar Group: नागपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का

  • मोठे नेते शहाजाह अन्सारी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  • नागपूरमध्ये अजित पवार गटाची ताकद वाढली

  • राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पराग ढोबळे, नागपूर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील अनेक राजकीय पक्षांना एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. बड्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जोरदार पक्षांतर सुरू आहे. अशातच विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.

नागपुरच्या कामठी मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष शहाजाह शफाहत अन्सारी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष प्रमोद मानवटकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीचे घड्याळ हातामध्ये घातले. यामुळे नागपुरमध्ये काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली आहे.

१५ नोव्हेंबरला झालेल्या उमेदवारी निवड बैठकीत अनुभवी नेत्यांना डावलून नवीन लोकांना संधी दिल्याने काँग्रेसच्या या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. २०१७ मध्ये काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देणारे आणि १६,६३० मतांनी विजय मिळवणारे शहाजाह शफाहत अन्सारी हे पक्षाचे सर्वात प्रभावी व्यक्तीमत्व आणि परिचित चेहरा आहेत. त्यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये नाराज झालेल्या शहाजाह शफाहत अन्सारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतली. अन्सारी यांनी नगराध्यक्ष पदासह सर्व ३४ वार्डांतून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा यावेळी केली. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद कमी होऊन अजित पवार गटाची ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला उमेदवारी

PM Kisan Yojana: आजच हे काम करा, अन्यथा मिळणार नाही पीएम किसानचे ₹२०००; वाचा नवी अपडेट

Venus And Sun Yuti: जानेवारीमध्ये बनणार शुक्रादित्य राजयोग; या राशींना होणार धनलाभ

Atharva Sudame : रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान, पुण्याचा रिलस्टार अथर्व सुदामे अडचणीत, PMPL नं पाठवली नोटीस

Tilachi Vadi Recipe : मकर संक्रांतीला खास बनवा तिळाच्या वड्या, वाचा इंस्टंट रेसिपी

SCROLL FOR NEXT