Maharashtra Politics: महाराष्ट्रात सर्वात मोठी घडामोड; राज्यातील राजकारणात नवीन पक्षाची एंट्री, शरद पवारांसह, महायुतीचं वाढलं टेन्शन

New Political Party NPP Entry into Maharashtra Politics: महाराष्ट्रात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून स्थापन झालेल्या नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) ने राजकारणात प्रवेश केलाय. जिल्हा परिषद निवडणुका लढवण्याची तयारी सुद्धा या पक्षाकडून करणअयात आलीय.
New Political Party NPP  Entry into Maharashtra Politics
NPP announces its entry into Maharashtra politics, signaling a major shift ahead of local body elections.saam tv
Published On
Summary
  • राजकारणात नवीन पक्षाची एंट्री

  • नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार

  • शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून निर्माण झालेल्या पक्षाची राजकारणात एंट्री

संजय जाधव, साम प्रतिनिधी

बिहार विधासभा निवडणुकीचा निकाल एका दिवसापूर्वी लागला. या निवडणुकीत एनडीएला मोठं यश मिळालं. या निकालाचा प्रभाव राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर होणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचा आत्मविश्वास वाढलाय. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप होणार आहे. भाजपसह इतर पक्षांची चिंता वाढवणारी बातमी हाती आलीय. कारण राज्यातील राजकारणात नव्या पक्षाची एंट्री झालीय.

New Political Party NPP  Entry into Maharashtra Politics
Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून निर्माण झालेला नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची धामधूम सुरु असताना राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडलीय. राजकारणात आता नवीन पक्षाची एंट्री झालीय, तो म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी (NPP).

New Political Party NPP  Entry into Maharashtra Politics
By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

ईशान्य भारतातील मेघालय राज्यात 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा यांनी या नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षाची स्थापना केलीय. आधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्यावर त्यांनी एनपीपीची स्थापना केली. भारतातील आदिवासी आणि स्थानिक समाजाच्या हक्कांसाठी काम करणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे.

2023 मध्ये मेघालय विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात हा सर्वात मोठा पक्ष ठरला व नॅशनल पीपल्स पार्टीला 2023 मध्ये राष्ट्रीय पक्षाचीही मान्यता मिळाली. प्रादेशिक असला तरी सध्या हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. मेघालयसह, मणिपूर, नागालँड, झारखंड व असाम या राज्यात या पक्षाचा दबदबा आहे व सध्याही मेघालय मध्ये एन पी पी या पक्षाचे कोरांड संगमा हे मुख्यमंत्री आहेत. या पक्षाने एनडीए सोबत काही राज्यात युती केली आहे.

मात्र आता या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केलीय. नुकतच दिल्ली येथे मेघालय चे मुख्यमंत्री कोराड संगमा यांनी महाराष्ट्रात या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदी अमित वेळूकर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे एनपीपी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित वेळूकर हे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद निवडणुकीत एन पी पी पक्ष आदिवासी भागात आपले उमेदवार देणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात या पक्षाने एन्ट्री केली आहे. राज्यात हा पक्ष कोणत्या भागात कशी काम करणार..? पक्षाचा विस्तार कसा करणार? पक्षाचे ध्येय धोरणासंबंधी NPP चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमित वेळूकर यांनी माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com