

शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केलाय.
या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळाली आहे.
हा प्रवेश भाजपासाठी मोठा धक्का असून स्थानिक पातळीवर समीकरण बदलणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला मोठा धक्का दिलाय.माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे विश्वासू सहकारी असलेले शरद पवार यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय.
अजित पवार यांच्या भाजपचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थित दादाच्या राष्ट्रवादीत पक्ष (Nationalist Congress Party) प्रवेश केला. यापूर्वी शरद पवारांनी लोहा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदावर काम केले आहे. आता लोहा नगरपालिकेचे निवडणूक लागलेली असताना शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू मानली जात आहे. तर लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या राजकारणात मोठ्या हालचाली होत आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून तर पक्षांतराचे पेव फुटलंय. आपल्या पक्षात तिकीट मिळत नसल्याचे समजताच माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक सोईच्या पक्षात उड्या मारत आहेत.
विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही गटांत पक्षांतराची लाट उसळलीय. संधी मिळत नसल्यानं नवीन संधीसाठी नेतेमंडळी सध्याच्या पक्षाचा राजीनामा देऊन मित्रपक्षामध्ये सामील होत आहेत. आता नांदेडमध्ये अजित पवार गटानं भाजपला धक्का दिलाय.
नांदेड जिल्ह्यातील भाजपचे लोहा तालुका मंडळ अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. शरद पवार यांनी लोहाचे उपनगराध्यक्ष म्हणून काम केलंय. शरद पवार हे भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.