Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसला हादरा! शिंदेसेनेच्या गळाला लागला मोठा मासा; शेकडो पदाधिकाऱ्यांसह 'धनुष्यबाण' घेणार हाती

Congress Set for Major Blow: अकोल्यात काँग्रेसला मोठा हादरला बसणार आहे. काँग्रेसचा बडा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर आहे. लवकरच शेकडो कार्यकर्त्यांसह ते पक्षप्रवेश करणार आहे.

Priya More
  • अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का

  • अभय पाटील शिंदेसेनेत प्रवेश करणार

  • डॉ. अभय पाटील यांची एकनाथ शिंदे यांच्याशी भेट

  • अभय पाटील यांच्या घरी निलेश देशमुखांची दोन तास चर्चा

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यात रात्री मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. अकोल्यात काँग्रेसकडून लोकसभा लढवलेले डॉ. अभय पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास असलेल्या ॲड. निलेश देशमुखांनी भेट घेतली. डॉ. अभय पाटील यांच्या टॉवर चौकातील निवासस्थानी रात्री उशिरा ही भेट झाली. वर्षभरापूर्वी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन काँग्रेस सोडणारे डॉ. अभय पाटील मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अभय पाटील शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याने अकोल्यात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

नुकताच डॉ. अभय पाटील यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. पुढच्या २ दिवसांत डॉ. अभय पाटील आपल्या समर्थकांची बैठक घेऊन आपला राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बैठकी आधी ॲड. निलेश देशमुख यांनी डॉ. अभय पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोघांमध्ये दोन तास बंद दाराआड चर्चा आणि 'डिनर डिप्लोमॅसी' झाली.

अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठा राजकीय मासा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२४ मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेल्या डॉ. अभय पाटील यांनी नुकताच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दोघांच्या तासभराच्या भेटीत पुढच्या राजकीय निर्णयाबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. डॉ. अभय पाटील यांच्या भेटीसाठी निलेश देशमुख यांनी थेट अकोल्यात धाव घेतल्याने डॉ. अभय पाटील लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अभय पाटील हे तब्बल ४ लाख १६ हजार मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिले होते. तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी डॉ. अभय पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अकोल्यात नुकतीच त्यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय. डॉ. अभय पाटलांनी पुढच्या दोन दिवसांत समर्थकांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर डॉ. अभय पाटील पुढचा राजकीय निर्णय घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीनिमित्त ठाण्यातील वाहतुकीत फेरबदल; १७ मार्गांवर निर्बंध

Thirsty After Drinking Water: पाणी प्यायल्यानंतरही सतत तहान लागतेय? शरीर देतंय 'हे' ७ संकेत, कारणं जाणून घ्या

Heart Attack : कोलेस्ट्राल वाढलयं? चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, येऊ शकतो हार्ट अटॅक

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंच्या जवळच्या मंत्र्याला झटका, महत्वाच्या अधिकाराला कात्री; राजकीय वर्तुळात खळबळ

Egg Health : अंड्यांसोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत? यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT