Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत; राज्यातील बड्या मंत्र्याचं मोठं विधान, थेट भाजपला डिवचलं

Eknath Shinde should be Maharashtra Chief Minister again : एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे आमदार-खासदार वाढल्यास भविष्यात मुख्यमंत्रीपदावर दावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Eknath Shinde latest news,
Eknath Shinde latest news,Saam TV Marathi
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी

Eknath Shinde latest news : मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. "एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत," अशी इच्छा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनीही अशीच मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला आज प्रताप सरनाईक यांनी उघड पाठिंबा दिला.

सध्याच्या परिस्थितीत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने मुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे. भविष्यात शिवसेनेचे आमदार आणि खासदार अधिक संख्येने निवडून आल्यास शिवसेना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा करेल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. प्रताप सरनाईकांच्या या वक्तव्यावर भाजप काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Eknath Shinde latest news,
जवानांवर कोसळलं नैसर्गिक संकट! ४ सैनिक शहीद, तर ५ बेपत्ता; लष्कराकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले. भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

Eknath Shinde latest news,
पुणेकरांना मोठं गिफ्ट! नवीन एक्स्प्रेस धावणार,कोण कोणत्या स्थानकावर थांबणार? कधी सुरू होणार? वाचा अपडेट

तरुणाचा अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी

आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय त्वरित लागू करावा, या मागणीसाठी धाराशिवमध्ये एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असतानाच अभिजीत देडे या तरुणाने अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमस्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही हा तरुण हातात डिझेलचा कॅन घेऊन आला आणि अंगावर डिझेल ओतून जोरदार घोषणाबाजी करू लागला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून या तरुणाला तत्काळ ताब्यात घेतले. "केंद्र सरकारने 'अ-ब-क-ड' आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे, मात्र राज्य सरकार हा निर्णय लागू करत नसल्याने आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे; हा निर्णय तातडीने लागू करावा," अशी मागणी आंदोलक तरुणाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com