Famous Singer : घटस्फोटाच्या ६ वर्षांनी प्रसिद्ध गायिका बांधणार दुसरी लग्नगाठ, होणारा नवरा आहे तरी कोण?

Famous Singer Second Marriage Announcement : प्रसिद्ध गायिका घटस्फोटाच्या ६ वर्षांनी दुसरे लग्न करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला.
Famous Singer  Second Marriage Announcement
Famous SingerSAAM TV
Published On: 
Summary

प्रसिद्ध गायिका करतेय दुसरे लग्न

वयाच्या ४३ वर्षी बांधणार लग्नगाठ

होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो शेअर करून दिली गुडन्यूज

मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम पार्श्वगायिका रिमी टॉमी (Rimi tomy) हिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. गेले काही दिवसांपासून गायिका आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत होती. गायिकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ती लग्न बंधनात अडकणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

गायिका रिमी टॉमी नोव्हेंबर महिन्यात लिबिन मॅथ्यू (Libin Mathew ) याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. लिबिन मॅथ्यू हा मुंबईत राहणारा मल्याळी बॉडीबिल्डर आणि फिटनेस ट्रेनर आहे. रिमीने नुकत्याच केलेल्या दुसऱ्यांदा लग्नाच्या घोषणेने चाहत्यांना आनंद झाला आहे.

गायिकेचा होणारा नवरा कोण?

आपल्या यूट्यूब चॅनेलवरील एक खास व्हिडीओ शेअर करून गायिकेने आपली लव्ह स्टोरी सांगितली आहे. रिमीने सांगितले की, "आम्ही नोव्हेंबरमध्ये लग्न करत आहोत. मुलगा मुंबईचा राहणारा असून तो मल्याळी आहे. तो एक बॉडीबिल्डर आणि ट्रेनर आहे. तो सध्या माझा कोच आहे. त्याचे नाव लिबिन मॅथ्यू आहे" गायिकेने ही गुडन्यूज देतात चाहते आणि कलाकार मंडळी दोघांवर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहे.

पहिलं लग्न

रिमी टॉमीचे पहिले लग्न व्यावसायिक रॉयस किझाकूदन (Royce Kizhakoodan ) यांच्याशी झाले होते. त्या दोघांनी एप्रिल २००८ रोजी लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या ११ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला आणि आता जवळपास ६ वर्षांनी गायिका आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे.

Famous Singer  Second Marriage Announcement
Famous Actor : बॉलिवूडमध्ये दहशतीचे वातावरण! टायगर, तुषारनंतर 'या' सुपरस्टारला धमकी; लॉरेन्स गँगच्या नावाने कोट्यवधींची खंडणी

रिमी टॉमीची कारकीर्द

रिमी टॉमीने आपल्या आवाजाने चाहत्यांना वेड लावले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रिमी टॉमीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनवरील संगीत कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करून केली. तिने २००२ साली प्रदर्शित झालेल्या 'मीसा माधवन' या चित्रपटासाठी 'चिंगमासम वन्नू चेरन्नल' हे तिचे पहिले गाणे रेकॉर्ड केले. त्यानंतर २०१३ साली आशिक अबू दिग्दर्शित '5 सुंदरिकल' या चित्रपटाद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सध्या ती 'फ्लॉवर्स टॉप सिंगर' या शोमध्ये परीक्षक म्हणून काम करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.