Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ; PHOTO शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का, नवरा आहे तरी कोण?

Marathi Actress Wedding : मराठमोळी अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो शेअर करून तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Marathi Actress Wedding
Famous ActressSAAM TV
Published On: 
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटात पार पडला शाही विवाह सोहळा

लग्नाचे फोटो शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज

नवराही आहे मनोरंजन विश्वातील कलाकार

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. 'आई कुठे काय करते' फेम मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) ने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्रीचा नवरा कोण जाणून घेऊयात.

अभिनेत्री अश्विनीचा नवरा कोण?

अभिनेत्री अश्विनी महांगडेने लग्नाची खास पोस्ट इन्स्टाग्रामवर केली आहे. ज्यात तिने लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. अश्विनी महांगडेने अभिनेता आणि कुस्तीपटू भूषण शिवतारेसोबत लग्नगाठ बांधली आहे. आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. पहिल्या फोटोत भूषण अश्विनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. दुसऱ्या, तिसऱ्या फोटोत दोघे फेरे घेत आहेत. त्यानंतर दोघेही काही खास रोमँटिक पोज देताना दिसत आहे. त्यांच्यावर फुलांची उधळण होत आहे.

सोशल मिडिया पोस्ट

अश्विनीने फोटोंना कॅप्शनमध्ये लिहिलं की, "लग्नाचे सर्वात प्रबळ प्रतीक म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे एकत्र उभे राहणे नव्हे. तर, दोन स्वतंत्र अस्तित्वांचे एकरूप होणे हे होय. आमची टीम! " अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. त्यांना भरभरून प्रेम देत आहेत.

अश्विनी-भूषणचा लूक

अश्विनीने लग्नासाठी पारंपरिक मराठमोळा लूक केला होता. तिने केसरी रंगाची नऊवारी साडी नेसली. हातात हिरवा चुडा, नाकात नथ, कपाळावर मुंडावळ्या, गळ्यात दागिन्यांमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. भूषणने देखील ऑफ व्हाइट आणि गोल्डन रंगाचे शाही कपडे परिधान केले होते.

Marathi Actress Wedding
Bigg Boss 20 मध्ये शॉकिंग एविक्शन! घराबाहेर जाणार 'हा' सदस्य, नाव वाचून बसेल ४४० व्होल्टचा धक्का

अश्विनी-भूषण यांचे काम

अश्विनी महांगडे आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये दिसली आहे.'स्वराज्यरक्षक संभाजी', 'अस्मिता', 'आई कुठे काय करते', 'घरोघरी मातीच्या चुली' या तिच्या मालिका खूप गाजल्या. अभिनेता भूषण 'सुभेदार' या चित्रपटात झळकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com