Famous Singer : प्रसिद्ध गायक झाला बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा, ५ महिन्यांपूर्वी बांधली लग्नगाठ

Famous Singer Become Father : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाने गुडन्यूज दिली आहे. गायक बाबा झाला आहे. महिन्यांपूर्वी गायकाने गुपचूप लग्नगाठ बांधली होती.
Famous Singer Become Father
Famous SingerSAAM TV
Published On: 
Summary

प्रसिद्ध गायकाने चाहत्यांना दिली गुडन्यूज

बॉलिवूड गायक झाला बाबा!

गायकाच्या घरी गोंडस बाळाचे स्वागत

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) बाबा झाला आहे. गायकाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवात जुबिनच्या घरी हा आनंद आला आहे. याची माहिती स्वतः गायक जुबिनने दिली आहे. जुबिन नौटियालचा आवाज चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो.

गणेश चतुर्थीला जुबिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. 'बॉम्बे टाइम्स'शी बोलताना जुबिनने ही आनंदाची बातमी दिली. तो म्हणाला, "हो, मी आता बाबा झालो आहे! १४ सप्टेंबर रोजी, गणेश चतुर्थीच्या अत्यंत शुभ दिवशी आमच्या मुलाचा जन्म झाला. आई आणि बाळ दोघेही घरी परतले असून ते सुखरूप आहेत." जुबिनच्या आयुष्याचे नवीन पर्व सुरू झाले आहे.

घरात आलेल्या या चिमुकल्या पाहुण्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. "आम्ही आमच्या मुलाचे नाव अजून ठरवलेले नाही... सध्या आम्ही त्याच्यासोबतचे ते सुंदर क्षण अनुभवण्यात मग्न आहोत..." असे जुबिन म्हणाला. जुबिन नौटियालने एप्रिल 2026 मध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली होती आणि आता सप्टेंबर २०२६ ला त्याने बाबा झाल्याची गुडन्यूज शेअर केली आहे.

Famous Singer Become Father
Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या ८ महिन्यांत गाशा गुंडाळला

जुबिन नौटियाल करिअर

'रातां लंबियां', 'तुझे कितना चाहें और', 'काबिल हूँ', 'लो सफर' , 'जिंदगी कुछ तो बता' ही जुबिन नौटियालची गाजलेली गाणी आहेत. बाबा झाल्याची बातमी समजताच संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील मित्र, कलाकारमंडळी आणि चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांनाही नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com