Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या ८ महिन्यांत गाशा गुंडाळला

Serial Actress Emotional Post : लोकप्रिय मराठी मालिका वर्षभरातच संपली. मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
Serial Actress Emotional Post
Marathi Serial Off AirAI PHOTO
Published On: 
Summary

मराठी मालिका फक्त ८ महिन्यांत संपली

मुख्य अभिनेत्रीने केली भावुक पोस्ट

चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे

मालिका या प्रेक्षकांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे, विशेषत: महिला वर्ग मालिका आवडीने पाहतात. मराठी मालिकांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. मालिकेत घडणारी गोष्टी प्रेक्षकांना आपल्याच घरातील वाटते. स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत आणि अनेक जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता आणखी एक मालका संपली आहे.

प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका 'तुझ्या सोबतीने' संपली आहे. अवघ्या ८ महिन्यांता मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे. तसेच प्रेक्षक नाराज झाले आहेत. ही मालिका जानेवारी २०२६ मध्ये सुरू झाली होती आणि आता सप्टेंबर २०२६ ला मालिका संपली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत मराठी अभिनेत्री एताशा संसगिरी आणि मराठी अभिनेता अजिंक्य ननावरे झळकले.

मालिका संपल्यावर अभिनेत्री एताशा संसगिरीने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने मालिकेचा प्रवास आणि शूटिंग दरम्यानचे फोटो शेअर केले आहे. तिच्या या पोस्टवर चाहते, प्रेक्षकवर्ग भरभरून कमेंट्स करत आहे. एताशा संसगिरी आणि अजिंक्य ननावरे या मालिकेतील जोडीला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे.

एताशा संसगिरीची भावुक पोस्ट

"आणि तसाच… नुपूरचा प्रवास संपतो.

स्टार प्रवाहवर तुझ्या सोबतीने कालचा दिवस भावनिक ठरला. माझ्या प्रवासाचा इतका सुंदर भाग बनलेल्या पात्राला, सेटला आणि टीमला निरोप देणं सोपं नव्हते.

आम्ही एकत्र तयार केलेल्या आठवणींमधील काही चित्रे आणि व्हिडिओ शेअर करत आहे. हशा, वेडेपणा, मोठे दिवस, उत्सव, शॉट्समधील छोटे क्षण आणि पडद्यामागे घडलेल्या सर्व गोष्टी.

माझ्या संपूर्ण तुझ्या सोबतीन परिवाराला - हा प्रवास इतका खास बनवल्याबद्दल धन्यवाद. कॅमेरा ऑन आणि ऑफ अथक परिश्रम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे, तुमच्या प्रेम, समर्थन आणि कठोर परिश्रमाबद्दल धन्यवाद. स्टार प्रवाह वाहिनीचे आभार...

Serial Actress Emotional Post
Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा-बाय बाय? 'या' स्पर्धकाच्या नावाची जोरदार चर्चा

माझ्या सुंदर प्रेक्षकांना - धन्यवाद! नुपूरचे तुमच्या हृदयात स्वागत केल्याबद्दल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला साकारण्याची संधी मिळालेल्या प्रत्येक पात्रावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. तुमचे मेसेज, कौतुक आणि सतत पाठिंबा यामुळेच हा प्रवास माझ्यासाठी अर्थपूर्ण झाला आहे.

प्रत्येक पात्र काही ना काही मागे सोडते आणि नुपूरचे माझ्या हृदयात नेहमीच खास स्थान असेल.

त्यामुळे सध्या नुपूर signing off करत आहे. पण हे नक्कीच अलविदा नाही. आम्ही सोशल मीडियावर येथेच कनेक्ट राहू आणि मी वचन देते की मी लवकरच माझ्या आगामी प्रकल्पांबद्दल माहिती शेअर करेन! तोपर्यंत, पाहत राहा, प्रेम करत रहा आणि तुमचा नेहमीच मला पाठिंबा देत रहा. प्रेमाने, नूपुर (तुझी लाडकी एताशा)"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com