'विकेंड का वार'मध्ये सलमान खानने रीती तिवारीला चांगलेच सुनावले
एलिमिनेशनसाठी घरातील दोन नावांची तुफान चर्चा
घरातून पहिला सदस्य जाणार बाहेर
'बिग बॉस २०' चा तिसरा आठवडा सुरू आहे. 'विकेंड का वार'मध्ये सलमान खान सदस्यांची शाळा घेताना तसेच त्यांचे कौतुक करताना दिसत आहे. या आठवड्यात दोन स्पर्धक 'डेंजर झोन'मध्ये आहेत. त्यामुळे मागील नॉमिनेशन फेऱ्यांच्या तुलनेत ही एलिमिनेशन फेरी अधिक रोचक असणार आहे. या आठवड्यात 'यंग डीएसए' आणि 'ईशा रिखी' यांना नॉमिनेट करण्यात आले आहे.
तिसऱ्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमुळे घरातील स्पर्धकांमधील समीकरणे स्पष्ट झाली आहेत. नॉमिनेशन टास्कदरम्यान, घरातील सदस्यांना अशा दोन स्पर्धकांची नावे सांगण्यास सांगितले गेले ज्यांना त्यांना सुरक्षित करायचे होते. अनेक स्पर्धकांना त्यांच्या मित्र-सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला, परंतु 'यंग डीएसए' आणि 'ईशा रिखी' यांना पुरेसा पाठिंबा मिळू शकला नाही. परिणामी, हे दोघेही तिसऱ्या आठवड्यातील एलिमिनेशनच्या शर्यतीत आले.
'रेशन टास्क'दरम्यान अमनने आपल्या अधिकाराचा वापर करून 'यंग डीएसए'चे एक 'लाईफ' (जीव/संधी) काढून घेतली. 'रँकिंग टास्क'मध्ये पहिले 'लाईफ' गमावल्यामुळे ईशालाही मोठा फटका बसला. त्यामुळे सोशल मीडियावर एलिमिनेशनची चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरील चर्चांनुसार, 'यंग डीएसए'ला ऑनलाइन अधिक पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे या आठवड्यात ईशा रिखी बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.
आता 'बिग बॉस २०' च्या घरातून कोण निरोप घेणार हे आज 'विकेंड का वार'मध्येच स्पष्ट होईल. यात प्रेक्षकांनी दिलेली मते खूपच महत्त्वाची ठरतील. 'विकेंड क वार'मध्ये सलमान खान रीती तिवारीवर भडकताना दिसला. 'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळते. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता प्रसारित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.