'Bigg Boss 20'च्या घरात आठवडाभर चालणार 'या' सदस्याची सत्ता, यंग डीएसएनंतर नवा कॅप्टन कोण?

BB 20 Second Week Captain : 'बिग बॉस २०'च्या घरात कॅप्टन्सी टास्क रंगला. घराला आपला दुसरा कॅप्टन मिळाला आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये नेमकं झालं काय आणि कोणी बाजी मारली जाणून घेऊयात.
BB 20 Second Week Captain
Bigg Boss 20SAAM TV
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात रंगला कॅप्टन्सी टास्क

बिग बॉसच्या घरात दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन ठरला

टास्क दरम्यान स्काउटचा अरिशफासोबत जोरदार वाद झाला

'बिग बॉस २०'चा आता दुसरा आठवडा सुरू आहे. दुसऱ्या आठवड्यात झालेल्या कॅप्टन्सी टास्कमुळे स्पर्धकांमध्ये जोरदार वाद झाले. कॅप्टनसी टास्कमध्ये अरिशफा आणि स्काउट यांच्याच भांडणे पाहायला मिळाली. बिग बॉसने दुसऱ्या कॅप्टन्सीसाठी एक अनोखा टास्क दिला होता, जो मुली विरुद्ध मुलांमध्ये होता. नियमांनुसार, घरातील महिला सदस्यांना पुरुषांवर रंग फेकायचा होता, तर मुलांना स्वतःचा बचाव करायचा होता. या बचावासाठी त्यांना सोफा, खुर्च्या आणि उशा वापरण्याची परवानगी होती. या खेळादरम्यान, स्काउट अरिशफा खानसोबत जोरदार वाद झाला.

टास्कच्या दुसऱ्या फेरीत कनिकाला मॉडरेटर म्हणून नेमण्यात आले होते. गेम दरम्यान, यंगने माहीला तिच्या चेहऱ्यावर हल्ला न करण्याची विनंती केली. माहीने लगेच प्रत्युत्तर दिले की, यंगनेच तिला तसे करण्यास भाग पाडले होते. टास्क संपल्यावर ईशा एकटी बसून रडताना दिसली. तिला इतकी खचलेली पाहून, माही तिच्याकडे गेली आणि तिने विचारले की ती का रडत आहे. मात्र, ईशाच्या प्रतिक्रियेमुळे घरातील सदस्यही थोडे आश्चर्यचकित झाले होते.खरं तर, स्काउटने रागाच्या भरात अरिशफाला सांगितले होते की, तो तिला कानशिलात मारेल. यामुळे ईशाला खूप दुःख झाले. वातावरण हलके करण्यासाठी काझीने'जिंदगी एक सफर है सुहाना' हे गाणे गायले.

दुसरा कॅप्टन कोण?

कॅप्टन्सीची पुढची फेरी सुरू झाली, ज्याचे सूत्रसंचालन अरिशफा करत होती. आसिफ, अमन आणि गुल्लू पांढऱ्या रंगाचे कपडे घालून मैदानात आले. दरम्यान, आसिफ आणि अमन यांच्यात जोरदार बाचाबाचीही झाली. अखेरीस, बिग बॉसच्या सांगण्यावरून, अरिशफाने आसिफ आणि अमनला खेळातून बाहेर काढले, ज्यामुळे गुल्लू (कुशल तन्वर) दुसऱ्या आठवड्याचा कॅप्टन बनला. अशी माहिती 'बिग बॉस २०'ची माहिती देणाऱ्या BBTak ने दिली आहे. अद्याप बिग बॉसने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

BB 20 Second Week Captain
Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात महायुद्ध; आरिशफावर भडकला स्काउट, आम्रपाली अन् माहीमध्ये कडाक्याचे भांडण | VIDEO

कनिकाने गुल्लूला तिच्यासाठी अंडी आणि चिल्ला बनवायला सांगितले. दरम्यान, आम्रपालीने ठाम भूमिका घेतली आणि स्पष्टपणे सांगितले की, ती यापुढे कोणासाठीही स्वयंपाक करणार नाही. ती म्हणाली की ती गेल्या १० दिवसांपासून हेच ​​करत होती; आता ती फक्त साफसफाई करेल पण स्वयंपाक करणार नाही. 'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com