Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घरात हाय व्होल्टेज ड्रामा, माही विजचे अरिशफा खानसोबत कडाक्याचे भांडण| VIDEO

Mahhi Vij - Amrapali Dubey vs Arishfa Khan : 'बिग बॉस २०' च्या घरात भांडणांना सुरुवात झाली आहे. माही विजने घरात येताच आपला गेम दाखवला आहे.
Mahhi Vij - Amrapali Dubey vs Arishfa Khan
Bigg Boss 20SAAM TV
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात हाय व्होल्टेज ड्रामा

माही विजचे अरिशफा खानसोबत कडाक्याचे भांडण

अरिशफा खान आम्रपाली दुबेसोबत वाद घालते

सलमान खान होस्ट करत असलेला लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस २०'ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. दोन दिवसांतच घरातील सदस्यांनी बिग बॉसचे घर चांगलेच गाजवले आहे. 'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल.

शोच्या पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाल्या. शोच्या पहिल्याच दिवशी माही विजने आपला दरारा दाखवायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे कनिका मानही आपला खेळ दाखवत आहे. अशात आता 'बिग बॉस २०'चा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री माही विज भांडताना दिसत आहे. अरिशफा खान भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे आणि टीव्ही स्टार माही विज यांच्याशी भांडताना दिसत आहे. त्या तिघींना भांडताना पाहून मेरी कोमला हसू आवरता आले नाही.

प्रोमो व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातील सर्व सदस्य लिव्हिंग रूममधील सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. यावेळी आम्रपाली दुबेने अरिशफा खानला 'बच्ची' म्हटले. आम्रपाली दुबेकडे बोट दाखवत अरिशफा म्हणाली, "तुम्हाला वाटत असेल की मी लहान मुलगी आहे, पण माझं डोकं तुमच्यापेक्षा जास्त तल्लख आहे." अरिशफाच्या बोलण्यावर उत्तर देताना आम्रपाली दुबे म्हणाली, "हो, तुझी रील कापली जात आहे, कापली जात आहे." हे ऐकून अरिशफा संतापली, ती सोफ्यावरून उठून ओरडली, "माझी रील कापायची गरज नाही, माझ्या रील्स अशाच कापल्या जातात."

Mahhi Vij - Amrapali Dubey vs Arishfa Khan
Bigg Boss 20 : पहिल्याच दिवशी मोठा गेम! 'बिग बॉस २०' मधील स्पर्धकाला थेट बॉलिवूडमधून सपोर्ट; अभिनेत्रीच्या 'त्या' VIDEO मुळे खळबळ

क्षणातच, आम्रपाली आणि अरिशफा यांच्यातील या वादाचे रूपांतर एका मोठ्या भांडणात झाले. सोफ्याकडे बोट दाखवत अरिशफा ओरडली, "तुम्ही सगळे ढोंगी आहात!" अरिशफाचे शब्द ऐकून माही विजला राग आला आणि ती भांडणाच्या मध्ये घुसली. माही विजसुद्धा अरिशफावर ओरडली, "तुम्ही कसल्या ढोंगी आहात..." यावर अरिशफा म्हणाली, "मी तुला काहीही बोलले नाही." माही विज रागाने म्हणाली, "मग तुम्ही लोक कोण आहात?" यानंतर, आम्रपाली दुबे आणि माही विज दोघीही अरिशफा खानसोबत भांडू लागल्या.दरम्यान, अरिशफाचे माही विज आणि आम्रपाली दुबेसोबतचे भांडण पाहून मेरी कोम स्वयंपाकघरात हसताना दिसत आहे, ज्यामुळे घरातील इतर सदस्य थक्क झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com