माही-जय भानुशालीचा घटस्फोट, १४ वर्षांचा संसार मोडला; मुलगी तारा अन् दोन दत्तक अपत्य कोणासोबत राहणार?

Mahi Vij And Jay Bhanushali Announce Divorce: माही वीज आणि जय भानुशाली यांनी अखेर घटस्फोट झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून हे दोघे वेगळे होतील अशी चर्चा सुरू होती. पण आता माही आणि जय यांनी त्यावर पूर्णविराम लावला आहे. माही आणि जय यांचे लग्न होऊन 14 वर्षे झाली होती. यावेळी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांच्या नात्यात कोणीही खलनायक नाहीये.
Mahi Vij and Jay Bhanushali divorce reason
Mahi Vij and Jay Bhanushali divorce reasonSaam Tv
Published On
Summary

माही विज आणि जय भानुशाली यांचा 14 वर्षांनंतर घटस्फोट

परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय, कोणालाही दोष नाही

तिन्ही मुलांसाठी संयुक्त पालकत्व निभावण्याचा निर्धार

चाहत्यांना मोठा धक्का, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

टीव्हीवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी माही विज आणि जय भानुशाली यांनी अखेर घटस्फोट झाल्याचे सांगितले आहे. त्यांनी स्वतःच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे 14 वर्षांचे वैवाहिक जीवन आता संपुष्टात आले आहे. ही माहिती त्यांनी जाहीर केल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मागच्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. त्यानंतर त्यांनी आज रविवारी (दि. 4) जय आणि माहीने एकत्र स्टेटमेंट देत विभक्त झाल्याचे जाहीर केले.

Mahi Vij and Jay Bhanushali divorce reason
हनिमूनला निघाला अन् पोलिसांनी एअरपोर्टवरच बेड्या ठोकल्या, प्रसिद्ध मराठी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

जय आणि माही विजचे लग्न 2011 साली झाले होते. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी दोन मुलांना दत्तक घेतले. राजवीर आणि खुशी अशी त्यांचे नाव आहेत. मुलांना दत्तक घेतल्यानंतर दोन वर्षात माहिने 2019 साली एका सुंदर मुलीला जन्म दिला. तारा असे या मुलीचे नाव असून ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. लोकप्रिय स्टारकिड्समध्ये ताराचा समावेश होतो आणि तिचे व्हिडिओ आणि रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आता आई वडिलांच्या घटस्फोटानंतर तारा कोणसोबत राहणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Mahi Vij and Jay Bhanushali divorce reason
Bigg Boss : ठाण्यातील मराठमोळ्या अभिनेत्याला अटक, पोलिसांनी विमानतळाजवळून उचलले, नेमकं प्रकरण काय?

मात्र या प्रश्नाचे उत्तर जय आणि माही यांनी त्यांच्या पोस्टमध्येच लिहिले आहे. आयुष्याच्या या प्रवासात आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेत आहोत. पण आम्ही एकमेकांना साथ देत राहू. शांती, प्रगती, दयाळूपणा आणि माणुसकी ही नेहमीच आमची आयुष्यात मार्गदर्शक मूल्ये राहिली आहेत.

Mahi Vij and Jay Bhanushali divorce reason
Santosh Juvekar Video : संतोष जुवेकरचा रॉयल अंदाज; नवीन वर्षात खरेदी केली लग्जरी कार, VIDEO शेअर करत म्हणाला- "देखोना guysss देखोना..."

आमची मुले तारा, खुशी आणि राजवीर यांच्यासाठी आम्ही सर्वोत्तम पालक आणि मित्र बनून राहू. त्यांच्यासाठी जे काही योग्य आहे ते करण्यासाठी आणि जे काही भविष्यात करावे लागेल ते करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे त्यांनी आपले पोस्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com