Star Pravah Serials Time Change
Star Pravah Serialssaam tv

Marathi Serial Off Air : नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप, एका वर्षातच गाशा गुंडाळला

Star Pravah Marathi Serial Off Air : स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. वर्षभरातच मालिका संपली आहे. मालिकेच्या अभिनेत्रीने यासंबंधित पोस्ट केली आहे.
Published on
Summary

नवीन वर्षात मराठी मालिकांची मेजवानी पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

मालिकेची दोन वेळा वेळ बदलण्यात आली होती.

नवीन वर्षाला सुरूवात झाली आहे. नवीन वर्षात नवीन मालिकांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर दोन मालिका सुरू होत आहेत. एक 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' आणि दुसरी 'तुझ्या सोबतीने' मालिका. 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणार आहे. तर 'तुझ्या सोबतीने' मालिका 12 जानेवारीपासून रात्री 9:00 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

अशात आता स्टार प्रवाहची एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मराठी अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव मुख्य भूमिकेत असलेली मालिका 'कोण होतीस तू, काय झालीस तू!' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे शूटिंग झाले आहे. ही मालिका सध्या रात्री 10.30 वाजता पाहायला मिळायची.

मीडिया रिपोर्टनुसार, 'कोण होतीस तू, काय झालीस तू!' मालिका एप्रिल 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. एका वर्षाच्या आतच मालिकेने गाशा गुंडाळला. या मालिकेचे दोन-तीन वेळा टाइम बदलण्यात आले. पहिली मालिका 8 वाजता पाहायला मिळायची. त्यानंतर मालिका रात्री 11 वाजता प्रसारित झाली आणि आता शेवटी 10.30 वाजता मालिका प्रेक्षकांच्या भेटीला यायची.

Kon Hotis Tu Kay Zaalis Tu
Kon Hotis Tu Kay Zaalis Tusaam tv

गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या जोडीने यापूर्वी 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेत काम केले होते. या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका 5 जानेवारीपासून रात्री 10.30 वाजता पाहायला मिळणार आहे.

Star Pravah Serials Time Change
Deepika Padukone Video : बायको असावी तर अशी! 'धुरंधर'च्या यशाचा जल्लोष; दीपिकाने रणवीरसाठी बनवला 'हा' खास मराठमोळा पदार्थ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com