Deepika Padukone Video : बायको असावी तर अशी! 'धुरंधर'च्या यशाचा जल्लोष; दीपिकाने रणवीरसाठी बनवला 'हा' खास मराठमोळा पदार्थ

Deepika Padukone Made Maharashtrian Sweet Dish : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणने आपल्या लाडक्या नवऱ्यासाठी अस्सल मराठमोळा पदार्थ बनवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Deepika Padukone Made Maharashtrian Sweet Dish
Deepika Padukone Videosaam tv
Published On
Summary

रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाने जगभरात बक्कळ कमाई केली आहे.

'धुरंधर'च्या यशाचे रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण एकत्र सेलिब्रेशन करताना दिसले.

दीपिका पदुकोणने रणवीर सिंहसाठी गोड मराठमोळा पदार्थ बनवला.

'धुरंधर' ला जगभरात खूप यश मिळाले. 'धुरंधर' च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 'धुरंधर' हा रणवीर सिंहचा त्याच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट ठरला. 'धुरंधर' च्या यशाचे सेलिब्रेशन करताना दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह एकत्र दिसले. दोघे सध्या न्यूयॉर्कमध्ये नवीन वर्षांचे स्वागत करताना दिसत आहे. अशात आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात दीपिका पदुकोणने रणवीर सिंहसाठी खास मराठमोळा पदार्थ बनवला आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी शेफ विकास खन्ना यांच्या 'बंगलो' या रेस्टॉरंटमध्ये भेट दिली. येथे त्यांनी 'धुरंधर'चे यश साजरे केले. ज्याचा एक व्हिडीओ विकास खन्नाने शेअर केला आहे. ज्यात दीपिका पदुकोण विकास खन्नांकडून महाराष्ट्रीयन गोड पदार्थ मोदक बनवायला शिकली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विकास खन्ना रणवीर सिंहला मोदक भरवतो आणि त्याला मिठी मारून खूप शुभेच्छ देतो. तर दुसरीकडे दीपिका पदुकोण मोदक बनवताना दिसते.

दीपिकाने बनवलेला मोदक विकास खन्ना दीपिकाला भरवतात. या सुंदर व्हिडीओला 'धुरंधर' चे गाणे लावण्यात आले आहे. तसेच या व्हिडीओला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स, लाइक्सचा वर्षाव होत आहे.

'धुरंधर' चित्रपट

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाचे बजेट 250 कोटींच्या अधिक आहे. 'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे.

Deepika Padukone Made Maharashtrian Sweet Dish
Amitabh Bachchan Video : 'कौन बनेगा करोडपती 17'च्या सेटवर बिग बी का झालं भावुक? म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com