Amitabh Bachchan Video : 'कौन बनेगा करोडपती 17'च्या सेटवर बिग बी का झालं भावुक? म्हणाले...

Amitabh Bachchan Emotional Video : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती 17'च्या सेटवर भावुक झाले. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.
Amitabh Bachchan Emotional Video
Amitabh Bachchan VideoSAAM TV
Published On
Summary

'कौन बनेगा करोडपती 17'चा नवीन प्रोमो समोर आला आहे.

कार्यक्रमात अमिताभ बच्चन भावुक झाले.

'कौन बनेगा करोडपती 17' शोमध्ये 'इक्कीस' चित्रपटाची टीम आली.

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती 17' होस्ट करताना दिसत आहे. आज धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस' रिलीज झाला आहे. या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याच पार्श्वभूमीवर 'इक्कीस' चित्रपटाची टीम 'कौन बनेगा करोडपती 17'च्या सेटवर आले. ज्याचा धमाकेदार प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

'कौन बनेगा करोडपती 17'च्या नवीन प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झालेले पाहायला मिळत आहे. या भागात अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत आणि श्रीराम राघवन आले होते. त्यांच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. चाहते या भागासाठी खूप उत्सुक आहेत.

अमिताभ बच्चन म्हणाले की, "'इक्कीस' हा चित्रपट अनमोल आठवण आहे जी, लाखो लोकांसाठी एक महान व्यक्ती करोडो चाहत्यांसाठी सोडून गेली. एक कलाकार आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कलेसाठी जगतो. माझे मित्र, आदर्श, कुटुंब धर्मेंद्रजी. धर्मेंद्रजी फक्त एक माणूस नव्हते, तर एक भावना होती आणि भावना कधीच कोणाच्या मनातून जात नाही. भावना कायम तुमच्या आठवणीत राहते. तुम्हाला आशीर्वाद देतो. "

अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतची एक आठवण सांगितली. एकदा अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र बंगळुरूमध्ये शूटिंग करत होते. धर्मेंद्र हे कुस्तीगीर होते. एक मृत्यूच्या सीनमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांचा हात इतका घट्ट धरला की त्या खऱ्या वेदना पडद्यावर आल्या.

इक्कीस चित्रपट

'इक्कीस'(Ikkis) हा धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 'इक्कीस' चित्रपट 1 जानेवारी 2026 ला म्हणजे आज रिलीज झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत झळकला आहे. जयदीप अहलावत, एकवली खन्ना, सिकंदर खेर असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहे.

Amitabh Bachchan Emotional Video
Gharoghari Matichya Chuli : जानकी अन् हृषीकेशच्या वर्तमानावर भूतकाळाचं सावट; नवा प्रोमो पाहून बसेल धक्का-VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com